शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

‘धोकादायक’ सभागृहातच होणार केडीएमसीची महासभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 06:22 IST

केडीएमसीच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सभागृहाचे पीओपी अलीकडेच कोसळल्याने धोकादायक बनलेल्या या सभागृहात महासभेची बैठक घेण्यास सदस्यांकडून विरोध होत असतानाच येत्या १६ आॅगस्ट रोजी त्याच सभागृहात बैठक बोलावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : केडीएमसीच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सभागृहाचे पीओपी अलीकडेच कोसळल्याने धोकादायक बनलेल्या या सभागृहात महासभेची बैठक घेण्यास सदस्यांकडून विरोध होत असतानाच येत्या १६ आॅगस्ट रोजी त्याच सभागृहात बैठक बोलावली आहे.महापालिका भवन इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील सभागृहाचे पीओपी कोसळल्याची घटना १२ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. या सभागृहात मासिक महासभेसह मोठ्या बैठका पार पाडतात. ७ जुलैला तहकूब महासभा पार पडली होती. १२ जुलैला विधिमंडळ सदस्यांची या सभागृहात बैठक होणार होती. त्या पार्श्वभूमीवर ११ जुलैच्या सायंकाळी सभागृहाची पाहणी करून ते जय्यत तयार केले होते. परंतु, दुसºया दिवशी सकाळी ९ वाजता सभागृहाच्या छताला असलेले पीओपी सांगाड्यासह खालील आसनांवर कोसळल्याचे निदर्शनास आले.या घटनेमुळे बांधकाम विभाग आणि देखभाल दुरूस्ती करणारा कंत्राटदार वादाच्या भोवºयात सापडले आहेत. छत कोसळण्याच्या घटनेची चौकशी अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या घटनेला महिना होत आला तरी त्यांनी या संदर्भातील अहवाल अद्यापही आयुक्त पी. वेलरासू यांना सादर केलेला नाही.दर महिन्याच्या २० तारखेला महासभा होते. महिनाभरात एक महासभा घ्यावी असा नियम आहे. आॅगस्ट महिन्यात सभागृहाच्या दुरूस्तीचे काम पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. त्यात जागेअभावी महासभा घ्यायची कुठे? या विवंचनेत महापालिकेचे पदाधिकारी आणि अधिकारी पडले होते. महासभेचे आयोजन स्थायी समिती सभागृहात आसन व्यवस्था लावून करण्याबाबत चाचपणी करण्यात आली. हा प्रस्ताव महापौरांसह अन्य पदाधिकाºयांच्या पसंतीस पडला होती. मात्र आता ज्या सभागृहाचे छत कोसळले त्याच सभागृहात महासभा घेण्याचा निर्णय झाला आहे. पीओपीचा कोसळलेला सांगाडा काढण्यात आला असून अन्य कोणत्याही यंत्रणेचे नुकसान झालेले नाही. त्यामुळे तेथेच महासभा घेण्यावर प्रशासन आणि पदाधिका-यांचे एकमत झाल्याचे बोलले जात आहे.वेळप्रसंगी हेल्मेट घालून हजर राहू : पीओपी कोसळल्याच्या घटनेनंतर तत्काळ दुरूस्तीच्या कामाला सुरूवात व्हायला हवी होती. तोपर्यंत महासभा दुसरीकडे घ्यायला हवी होती. त्यासाठी स्थायी समितीच्या सभागृहातही आसनव्यवस्था लावून पाहण्यात आली होती. तथापि ‘त्या’ सभागृहातच सभा होणार असेल तर हेल्मेट घालून तेथे जाऊ आणि आम्ही जनतेचे प्रश्न मांडू.-मंदार हळबे, विरोधी पक्षनेते, कल्याण-डोंबिवली महापालिकासभागृह धोकादायक नाहीसभागृह धोकादायक नाही, केवळ छताला असलेले पीओपी कोसळले होते. ते बाजूला काढण्यात आले आहे तसेच सभागृहाला गळती नाही त्यामुळे त्याठिकाणी महासभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.- राजेंद्र देवळेकर, महापौर, कल्याण-डोंबिवली