शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीचा आपत्कालीन कक्षच 'आपत्तीत' - राजेश मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 18:20 IST

पावसाळ्या पूर्वी महापालिकेच्या प्रत्येक विभागीय कार्यालय मध्ये आपत्कालीन कक्ष तयार केला जातो. तसा यंदाही कल्याण डोंबिवली महापालिकेने तयार केला आहे, मात्र तेथिल सुविधांचा अभाव पाहता आपत्कालीन कक्षच आपत्तीत आल्याचे दिसून येत असल्याची प्रतिक्रिया महापालिका सभागृह नेते राजेश मोरे यांनी दिली.

ठळक मुद्दे कोयत्याला धार नाही, वॉकीटॉकी बंद आयुक्तांशी करणार पत्रव्यवहार

डोंबिवली - पावसाळ्या पूर्वी महापालिकेच्या प्रत्येक विभागीय कार्यालय मध्ये आपत्कालीन कक्ष तयार केला जातो. तसा यंदाही कल्याण डोंबिवली महापालिकेने तयार केला आहे, मात्र तेथिल सुविधांचा अभाव पाहता आपत्कालीन कक्षच आपत्तीत आल्याचे दिसून येत असल्याची प्रतिक्रिया महापालिका सभागृह नेते राजेश मोरे यांनी दिली.यासंदर्भात ‘लोकमत’च्या हॅलो ठाणेमध्ये शनिवारी ‘सतर्क रहायचे पण कसे’ या मथळयाखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते, त्याची दखल घेत मोरे यांनी डोंबिवलीतील ठिकठिकाणच्या आपात्कालीन कक्षांमध्ये जाऊन पाहणी केली. महापालिकेच्या उपइमारतीमधील ग आणि फ, ह प्रभागातील आपत्कालीन कक्षाची दुरावस्था झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तेथिल कोयता त्यांनी हातात घेतला, एका तोडलेल्या फांदीवर मारला असता त्याला धार नाही, कोयत्याचे लोखंड जीर्ण झाले होते. औषध व्यवस्थेत तुटवडा, औषधांचा बॉक्स रिकामा धुळखात पडला होता. महापालिकेने दिलेली साधनसामुग्री अपुरी असून त्याची सुद्धा दुरावस्था झालेली आहे. कक्षातील वॉकिटॉकी खराब झाला असून प्रथोमचार पेटीत ओषधे नाहीत. कामगारांना दिलेले कोयता तुटलेला असून इतर साहित्य पण काही कामाचे नसल्याचे कामगाराचं सांगतात. तर साहित्य कमी असल्याचे उघड झाले आहे. कक्षाची दुरवस्था असल्याने कर्मचा-यांनी काम तरी कसे करायचे असा सवाल त्यांनी अधिका-यांना केला. कर्मचारी अपुरा, साधनसामुग्री अपुरी मग आपात्कालीन स्थितीत नेमके आहे तरी कोण? असेही मोरे म्हणाले. त्यामुळे ही अतिशय गंभीर बाब असून त्याबाबत आयुक्तांशी पत्रव्यवहार करणार असल्याचे ते म्हणाले. तसेच या अवस्थेसंदर्भात जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करायची मागणी करणार असल्याचे ते म्हणाले. महापालिकेच्या सर्वच प्रभागांमधील आपत्कालीन कक्षाला योग्य ती साधनसामुग्री देण्यासाठी हालचाल करणार असल्याचे म्हंटले.  लोकमतच्या वृत्तानंतर जाग आली का? अशी चर्चा महापालिकेच्या आपत्कालीन विभागाच्या कर्मचा-यांसह नागरिकांमध्ये सुरु होती. या वृत्तामुळे अपेक्षित सुधारणा होतील का? की पुन्हा स्थिती ये रे माझ्या मागल्यासारखी असेल अशीही मत व्यक्त झाली.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याणdombivaliडोंबिवली