शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीला दिव्यांगांचे वावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 03:27 IST

दिव्यांग (अपंग) व्यक्तींच्या कल्याणासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी किमान तीन टक्के निधी राखून ठेवून तो कल्याणकारी कामांसाठी खर्च करणे बंधनकारक आहे.

कल्याण : दिव्यांग (अपंग) व्यक्तींच्या कल्याणासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी किमान तीन टक्के निधी राखून ठेवून तो कल्याणकारी कामांसाठी खर्च करणे बंधनकारक आहे. मात्र, सरकारच्या याबाबतच्या परिपत्रकाकडे केडीएमसीचे मात्र पुरते दुर्लक्ष झाल्याचे उघड झाले आहे.२०१० ते २०१७ दरम्यान तीन टक्के निधीच्या अनुषंगाने आतापर्यंत ३१० कोटी दोन लाखांची तरतूद करणे अपेक्षित होते. परंतु, केवळ १२ कोटी ७५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यातही केलेल्या तरतुदीतील सात वर्षांत ६२ लाख ३४ हजार रुपयेच खर्च झाल्याने १२ कोटी १२ लाख ६६ हजारांचा निधी खर्चाविना वाया गेल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. प्रशासनाची उदासीनता आणि हलगर्जी याला कारणीभूत आहे. संबंधित अधिकाºयांवर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.भारतीय संविधान अपंग कायदा १९९५ नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या वार्षिक अंदाजपत्रकाच्या किमान तीन टक्के निधी दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी राखून ठेवणे क्रमप्राप्त आहे. परंतु, केडीएमसी प्रशासनाने या सरकारी आदेशाची ऐशीतैशी केल्याचे चित्र माहितीच्या अधिकारात स्पष्ट झाले आहे.डोंबिवलीतील दिव्यांग दत्तात्रेय सांगळे यांनी मागवलेल्या माहितीच्या अधिकारात हे वास्तव उघड झाले आहे. मागील सात वर्षांत कायद्यान्वये ३२२ कोटी ७७ लाख रुपयांची तरतूद करणे अपेक्षित होते. परंतु, सरकारी परिपत्रकाकडे दुर्लक्ष करत महापालिकेने केवळ १२ कोटी ७५ लाखांचीच तरतूद केली. तीन टक्के निधी राखून ठेवणे बंधनकारक केले असताना केलेली तुटपुंजी तरतूद पाहता ३१० कोटी २ लाखांची तरतूद केली नसल्याचे उघड झाले आहे.तरतूद न केलेली ही रक्कम व तरतूद केलेला परंतु खर्च न केलेला १२ कोटी १२ लाख ६६ हजारांचा निधी अशा एकूण ३२२ कोटी १४ लाख ६६ हजारांच्या निधीपासून दिव्यांगांना प्रशासनाच्या उदासीनतेमुळे वंचित राहावे लागले आहे.विशेष म्हणजे, यंदाच्या २०१७-१८ च्या अंदाजपत्रकानुसार ६३ कोटींची तरतूद करणे बंधनकारक आहे. असे असताना केवळ ४ कोटी ६५ लाखांवर बोळवण करण्यात आली आहे. आजतागायत यातील एकही रुपया खर्च केला गेलेला नाही, याकडेही सांगळे यांनी लक्ष वेधले आहे. महापालिकेने सरकारी परिपत्रकाची उघडपघड पायमल्ली केली आहे. निधी खर्च न करता दिव्यांगांना त्यांच्या न्याय्य हक्कांपासून वंचित राहावे लागले आहे. संविधान व कायद्याच्या अनुषंगाने केंद्र सरकार सुगम्य भारत योजनेंतर्गत विविध प्रकल्पांसह अनेक योजना राबवत आहेत.उदासीनता कारणीभूतठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई, ठाणे आणि वसई-विरार महापालिका दिव्यांगांबाबत अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून कार्य करत असताना केडीएमसी याबाबत कोसो दूर आहे. दिव्यांगांच्या प्रश्नी महापालिका क्षेत्रातील दोन खासदार, चार आमदार आणि १२७ नगरसेवक हे देखील गांभीर्याने पाहत नसल्याने त्यांचीही उदासीनता या सर्व प्रकाराला कारणीभूत असल्याचा आरोप सांगळे यांचा आहे.आॅडिटची मागणीअत्यल्प व अखर्चित निधीच्या तरतुदीबद्दल संबंधित अधिकाºयांवर कारवाई करावी तसेच कॅग अथवा त्यांनी नेमणूक केलेल्या व्यक्तींकडून २०१०-१८ दरम्यानच्या अपंग निधीचे आॅडिट (लेखापरीक्षण) व्हावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा, नाइलाजास्तव उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी लागेल, असा इशाराही सांगळे यांनी दिला आहे.>सरकारी परिपत्रकानुसार न केलेली तरतूदसन केडीएमसी कायद्यान्वये अंदाजपत्रकीय तरतूद कायद्यान्वये नअंदाजपत्रक करावयाची तरतूद केलेली तरतूद२०१०-११ १२७६९७.३० ३८ कोटी २८ लाख ५० लाख ३७ कोटी ७८ लाख२०११-१२ १२९३५०.८६ ३८ कोटी ७९ लाख ०१ कोटी ३७ कोटी ७९ लाख२०१२-१३ १४८५९९.२० ४४ कोटी ५५ लाख ०१ कोटी ४३ कोटी ५५ लाख२०१३-१४ १५०८७९.३३ ४५ कोटी २४ लाख ०१ कोटी ५० लाख ४३ कोटी ७४ लाख२०१४-१५ १५९८८०.३५ ४७ कोटी ९४ लाख ०१ कोटी ५० लाख ४६ कोटी ४४ लाख२०१५-१६ १५१०५०.५५ ४५ कोटी ३० लाख ०३ कोटी ५० लाख ४१ कोटी ८० लाख२०१६-१७ २०८९४६.२१ ६२ कोटी ६७ लाख ०३ कोटी ७५ लाख ५८ कोटी ९२ लाखएकूण ३२२ कोटी ७७ लाख १२ कोटी ७५ लाख ३१० कोटी ०२ लाख२०१७-१८ २१००२४.०६ ६३ कोटी ४ कोटी ६५ लाख ५८ कोटी ३५ लाख