शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये फेरीवाल्यांविरोधात केडीएमसीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 00:43 IST

टेम्पो भरून माल जप्त; पोलीस बंदोबस्तात बडगा

कल्याण : पश्चिमेतील रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांच्या विरोधात गुरुवारी महापालिकेच्या फेरीवालाविरोधी पथकाने कारवाई केली. यावेळी फेरीवाल्यांची पळापळ झाली. कारवाई पथकाने एक मिनीटेम्पो भरून फेरीवाल्यांचा माल जप्त केला. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई झाल्याने तिला फेरीवाल्यांचा विरोध झाला नाही.कल्याण-मुरबाड रोडवरील आंबेडकर उद्यानासमोर व रुक्मिणीबाई रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यात रुग्णवाहिकेस अडथळा होईल, अशा प्रकारे फेरीवाले रस्त्याच्या दुतर्फा बसतात. त्यामुळे महापालिकेच्या फेरीवालाविरोधी कारवाई पथकाने पोलीस बंदोबस्तात तेथे कारवाई केली. यावेळी सरबताची गाडी तसेच फळविक्रेत्यांचा माल जप्त करण्यात आला. फेरीवालाविरोधी पथकाने स्कायवॉकवरील फेरीवाल्यांच्या विरोधातही कारवाई केली. पथकाने त्यानंतर साधना हॉटेल परिसरातील फेरीवाल्यांकडे मोर्चा वळविला.महापालिकेकडून स्थानक परिसरात कारवाई झाल्यानंतरही फेरीवाले तेथे पुन्हा बसतात. एसटी डेपोसमोरील रेल्वेस्थानकातील सरकत्या जिन्यांच्या समोरच तसेच स्कायवॉकवर अत्तर, मोजे, बेल्ट आदी विक्रेत्यांची गर्दी असते. त्यामुळे स्कायवॉकवर पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा नसते. स्कायवॉक रेल्वेच्या पादचारी पुलाला लागून असल्याने तेथील फेरीवाल्यांच्या विरोधात रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, त्यांच्याकडून कारवाई होताना दिसत नाही. रेल्वे परिसरात १५० मीटरच्या अंतरात फेरीवाले बसू न देणे ही रेल्वेची जबाबदारी आहे. मात्र, सगळी जबाबदारी महापालिकेच्या कारवाई पथकावर ढकलली जाते. कारवाईबाबत जबाबदारी कोणी घ्यायची, असाही मुद्दा असल्याने कारवाई होत नाही.जागा देण्यापूर्वीच कारवाई का?राष्ट्रीय फेरीवाला धोरण राबवण्यासाठी महापालिकेने सोडत पद्धतीने डोंबिवलीतील फेरीवाल्यांना जागांचे वाटप केले. मात्र, कल्याणमधील फेरीवाल्यांच्या जागांची सोडत अद्याप पार पडलेली नाही. त्यामुळे जागा देण्यापूर्वी कारवाई करून माल जप्त करणे योग्य आहे का, असा सवाल फेरीवाल्यांनी उपस्थित केला आहे.न्यायालयाच्या आदेशानुसार आधी जागा दिली गेली पाहिजे. त्या जागेत फेरीवाला व्यवसाय करीत नसेल, तर त्याच्याविरोधात कारवाई केल्यास त्याला फेरीवाल्यांचा विरोध नसेल. मात्र, या मुद्याकडे कारवाई करणारी महापालिका दुर्लक्ष करीत असल्याचे फेरीवाल्यांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :hawkersफेरीवाले