शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ताकर थकबाकीदारांसाठी केडीएमसीची अभय योजना; महापौर, आयुक्तांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 01:24 IST

१०० कोटी रुपये वसूल होणे अपेक्षित

कल्याण : केडीएमसी हद्दीतील मालमत्ताकराची थकबाकी न भरणाऱ्यांसाठी अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. थकबाकीदारांनी एकरकमी २५ टक्के रक्कम महापालिकेत भरल्यास त्यांच्या थकबाकीवरील ७५ टक्के व्याज व दंडाची रक्कम माफ केली जाईल. ही योजना १५ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२० दरम्यान लागू राहणार आहे.

अभय योजनेची घोषणा महापौर विनीता राणे व आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी आयुक्तांच्या दालनात केली. यावेळी सभागृह नेते प्रकाश पेणकर, ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे, मालमत्ता विभागाचे प्रमुख विनय कुळकर्णी आदी उपस्थित होते.

यासंदर्भात सूर्यवंशी म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्चपासून केडीएमसीची सर्व यंत्रणा कामाला लागली होती. तरीही, महापालिकेने मालमत्ताकराची आतापर्यंत १३९ कोटी वसुली केली आहे. ही वसुली मागच्या वर्षीच्या तुलनेत २३ कोटी रुपयांनी कमी आहे. महापालिका हद्दीत थकबाकीदारांकडून एकूण एक हजार ३८२ कोटी रु पये येणे अपेक्षित आहे. सगळीच थकबाकी वसूल होत नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव दूर झालेला नाही. मात्र, कोरोना रु ग्णांची संख्या सध्या स्थिरावलेली आहे. या अभय योजनेतून थकबाकीदारांकडून किमान १०० कोटी रु पये वसूल होणे अपेक्षित आहे. या योजनेचा लाभ थकबाकीदारांनी घेऊन योजनेला प्रतिसाद द्यावा. तसेच या योजनेतून जमा होणारे उत्पन्न हे कोरोना प्रादुर्भाव दूर करण्यावर खर्च केले जाईल, असे सांगण्यात आले. दरम्यान, कल्याण-डोंबिवली महापालिकेने राज्य सरकारकडे कोरोनाचा प्रादुर्भाव दूर करण्यासाठी २१४ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. त्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही.वास्तववादी अपेक्षायापूर्वीही मालमत्ताकराच्या वसुलीसाठी महापालिकेने अभय योजना जाहीर केली होती. तेव्हा एक हजार कोटी रु पये वसुलीचे लक्ष्य होते. प्रत्यक्षात ६५ कोटी रु पये वसूल झाले होते. त्यामुळे आताही अभय योजनेला प्रतिसाद मिळणार की नाही, असा सवाल उपस्थित केला असता आयुक्तांनी अपेक्षित उत्पन्न हे १०० कोटी रुपये धरले आहे. वास्तववादी आकडे अपेक्षित ठेवले आहेत. त्यामुळे योजनेला प्रतिसाद मिळेल, असा दावा त्यांनी केला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका