शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

केडीएमसी लावणार दीड लाख झाडे

By admin | Updated: June 25, 2016 01:32 IST

राज्य सरकारने १ जुलैला राज्यभरात दोन कोटी झाडे लावण्याचे आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने केडीएमसीला २० हजार रोपांची लागवड करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे.

कल्याण : राज्य सरकारने १ जुलैला राज्यभरात दोन कोटी झाडे लावण्याचे आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने केडीएमसीला २० हजार रोपांची लागवड करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. त्याची पूर्वतयारी झाल्याचा दावा महापालिकेने केला आहे. दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त वर्षभरात सव्वा लाख झाडे लावण्यात येणार आहेत.महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वृक्षारोपणाच्या विशेष मोहिमेत महापालिकेबरोबरच विकासकांचेही मोठे योगदान असणार आहे. आपटा, कांचन, नीम, बहावा, आवळा, करंज, गुलमोहर, सोनमोहर, बेल आदी झाडांची रोपे नागरिकांना दिली जाणार आहेत. तसेच सामाजिक संस्था, मंडळे, गृहनिर्माण संस्था, शाळा, महाविद्यालये, विविध कार्यालये, ज्येष्ठ नागरिक संस्था यांनाही रोपे दिली जाणार आहेत. रोपांची लागवड आणि संवर्धनाची जबाबदारी संबंधित संस्थांची राहणार आहे.वृक्षारोपण करणाऱ्या संस्था व देखभाल करणाऱ्या संस्थांना विकासकांना ट्री- गार्डसवर स्वत:ची जाहिरात करण्याची परवानगी दिली आहे. याबाबत महापालिकेशी थेट संपर्क साधावा अथवा नगरसेवकाच्या माध्यमातून पत्रव्यवहार केला जाईल, अशी माहिती देवळेकर यांनी दिली. महापौरांच्या दालनात झालेल्या बैठकीला सर्वपक्षीय पदाधिकारी आणि वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)