शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीत दीड कोटींचा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 01:09 IST

पूर्वेतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामात एक कोटी ४४ लाख रुपयांचा घोटाळा झाला आहे, असा तपशील माहिती अधिकारात उघड झाला आहे.

कल्याण : पूर्वेतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामात एक कोटी ४४ लाख रुपयांचा घोटाळा झाला आहे, असा तपशील माहिती अधिकारात उघड झाला आहे. याप्रकरणी कल्याण-डोंबिवलीच्या महापालिका आयुक्तांनी चौकशी करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्त्याने केली आहे.कल्याण पूर्वेतील खड्डे बुजवले जात नसल्याने महापालिकेविरोधात वर्षभरापूर्वी माहिती अधिकाराचे कार्यकर्ते विनोद तिवारी यांनी स्वाक्षरी मोहीम राबवली होती. तसेच स्वत: मोजमाप केली असता २६८ खड्डे असल्याचे उघड झाले होते. महापालिकेने वर्षभरानंतरही हे खड्डे बुजवलेले नाहीत. महापालिका तक्रारी व विनंती अर्जांना दाद देत नाही. खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेने १२ कोटी रुपयांची निविदा काढली आहे. असे असतानाही खड्डे बुजवले जात नाहीत. त्यामुळे तिवारी यांनी माहितीच्या अधिकारात पूर्वेतील केडीएमसीच्या ‘ड’ प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या हद्दीतील खड्डे बुजवण्याची माहिती महापालिकेकडे मागितली.२०१७-१८ वर्षात ‘ड’ प्रभाग कार्यालयांतर्गत येणाऱ्या २५ प्रभागांतील ७१ हजार ८० चौरस फूट आकाराचे खड्डे बुजवण्यासाठी प्रगती कन्स्ट्रक्शनला कंत्राट दिल्याची लेखी माहिती महापालिका अधिकाºयांनी तिवारी यांना दिली आहे. ज्या ठिकाणी कामाचे प्राकलन केले, तेथील खड्डे बुजवण्याऐवजी अन्य ठिकाणचे खड्डे बुजविले गेले. केलेल्या कामाची नोंद मोजमाप नोंदवहीत करावी लागते. त्यानंतर कंत्राटदार कंपनीचे बिल निघते. महापालिकेने काम केल्याची नोंद केली आहे. मात्र प्रत्यक्ष पाहणी केल्यास तेथे कामच झालेले नाही. मात्र, नोंदी आहेत. त्यामुळे खड्डे कागदोपत्री बुजवल्याची बाब यातून उघड झाली आहे, असे तिवारी म्हणाले.महापालिकेच्या अन्य नऊ प्रभाग क्षेत्र कार्यालयातील खड्डे बुजवले गेले आहेत का, हा देखील संशोधनाचा विषय आहे. माहितीच्या अधिकारात महापालिकेने तिवारी यांना माहिती दिली आहे. मात्र, काम का झाले नाही, याचे उत्तर मात्र अधिकाºयांकडे नाही. ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. माहितीमुळे अधिकाºयांचा प्रताप उघड होऊनही ते चूक मान्य करत नसल्याने तिवारी यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या घोटाळ्याबाबत अधिकाºयांना भयही नाही. आयुक्तांनी याप्रकरणी संबंधित अधिकाºयांची चौकशी करून त्यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी तिवारी यांनी केली आहे.