शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीचे २७ कोटी केले वळते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 00:42 IST

केडीएमसी हद्दीत नोंदणी होणाऱ्या घरांपोटी मुद्रांक शुल्क आकारले जाते.

- मुरलीधर भवारकल्याण : केडीएमसी हद्दीत नोंदणी होणाऱ्या घरांपोटी मुद्रांक शुल्क आकारले जाते. त्यातील एक टक्का रक्कम सरकारच्या महसुली खात्याकडून महापालिकेच्या तिजोरीत वळती केली जाते. मात्र, मुद्रांक शुल्कापोटीचे २७ कोटी ६० लाख रुपयांचे अनुदान सरकारने अमृत योजनेच्या महापालिकेच्या हिश्श्यापोटी सरकारी खात्यात जमा करून घेतले आहे. महापालिका आर्थिक संकटात असतानाच ही रक्कमही मिळू शकलेली नाही. त्यामुळे महापालिकेला थकीत देणी देताना नाकीनऊ येणार आहेत.महापालकेच्या खर्च व उत्पन्नात मागील वर्षी ३०० कोटी रुपयांची तूट होती. यंदाच्या वर्षी किमान २१७ कोटींची तूट असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे आयुक्तांनी प्रशासकीय अर्थसंकल्पात नव्या कामांना प्राधान्य न देता, तसेच कोणतीही करवाढ न सुचविता जुन्याच कामांची पूर्तता करण्यावर अधिक भर दिला जाईल, असे स्पष्ट केले होेते.आयुक्तांनी एक हजार ९३७ कोटी रुपयांचा प्रशासकीय अर्थसंकल्प सादर केला होता. त्यात स्थायी समितीने १८६ कोटींची वाढ सूचविली. हा अर्थसंकल्प महासभेने मंजूर केला. महापालिकेची मदार ही सरकारच्या अनुदानावर आहे. महापालिका हद्दीत जकात व एलबीटीवसुली बंद आहे. एलबीटीपोटी महापालिकेस सरकारकडून अनुदान मिळते. तसेच उपनिबंधकांकडे महापालिका हद्दीत ज्या घरांची नोंदणी होते, त्यापोटी मुद्रांक शुल्क आकारले जाते. मुद्रांक शुल्काच्या एकूण रक्कमेपैकी एक टक्का रक्कम सरकारकडून महापालिकेस वळती केली जाते. जून व जुलै २०१८ या दोन महिन्यांत घरांच्या नोंदणीपोटी जे मुद्रांक शुल्क महसूल विभागाच्या तिजोरीत जमा झाले. त्यापैकी एक टक्का रक्कम म्हणजेच २७ कोटी ६० लाख रुपये सरकार महापालिकेस देणार होते. मात्र महापालिकेच्या हद्दीत केंद्र सरकारने अमृत योजने अंतर्गत विविध योजना मंजूर केल्या आहेत. या योजनांकरिता ५० टक्के निधी महापालिकेच्या हिश्श्याचा आहे. महापालिकेने त्याची रक्कम सरकारकडे भरलीच नाही. त्यामुळे सरकारने महापालिकेस अनुदान न देता ही रक्कम अमृत योजनेच्या हिश्श्यापोटी आपल्याकडे जमा करून घेतली आहे. त्यामुळे महापालिकेस २७ कोटी ६० लाखांचा खड्डा सहन करावा लागला आहे.कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत अमृत योजने अंतर्गत मलनिस्सारण योजनेच्या पहिल्या टप्प्यातील १५३ कोटींची तर, दुसऱ्या टप्प्यात १२५ कोटींची योजना मंजूर झाली आहे. पहिल्या टप्प्याचे काम सुरू झालेले आहे. त्यामुळे या योजनेच्या १५३ कोटी रुपयांपैकी ५० टक्के रक्कम ७६ कोटी ५० लाख रुपये होते. या हप्त्यातील काही भाग सरकारने वळता करून घेतला आहे.>अखेर केडीएमसीला मिळाले १४ कोटीसरकारने यापूर्वीही एलबीटीपोटी महापालिकेस दिल्या जाणाºया अनुदानाच्या रक्कमेपोटी १४ कोटी रुपये वळते केले होते. अमृत योजनेच्या हिश्श्यापोटीच ही रक्कम वळती केली होती. महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक अधिकारी दिनेश थोरात यांनी सरकाकडे पत्र व्यवहार करून वळती केलेली १४ कोटींची रक्कम पुन्हा महापालिकेस मिळावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार सरकारने वळती केलेली १४ काटींची रक्कम महापालिकेस देऊ केली होती.>घरांची नोंदणी जोरातकेडीएमसी हद्दीत घरांच्या नोंदणीवर लावलेल्या मुद्रांक शुल्काच्या रक्कमेपैकी केवळ एक टक्का रक्कम महापालिकेस सरकारकडून दिली जाते. जून व जुलै २०१८ मधील एक टक्का म्हणजे २७ कोटी ६० लाख रुपये ही रक्कम आहे.त्यामुळे महापालिका हद्दीतून दोन हजार ७०० कोटी रुपयांचा महसूल केवळ घर नोंदणीच्या मुद्रांक शुल्क रक्कमेपोटी महसूल खात्याच्या तिजोरीत जमा झाला आहे. महापालिका हद्दीत घरांची नोंदणी जोरात सुरू आहे, हेच चित्र यावरून स्पष्ट होत आहे.