शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीला १२ वर्षांनंतर अखेर मिळाले उपसचिव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 00:17 IST

नियुक्तीचे घोडे गंगेत न्हाले : किशोर शेळके यांना आयुक्तांकडून नियुक्तीपत्र

कल्याण : केडीएमसीतील उपसचिवपदासाठी डिसेंबर २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत महापालिकेतील महिला बालकल्याण समिती विभागातील लिपिक किशोर शेळके यांना सर्वाधिक गुण मिळाल्याने ते या पदासाठी पात्र ठरले होते. मात्र, त्यांची उपसचिवपदावर नियुक्ती करण्यासंदर्भातील प्रस्तावाला जूनच्या महासभेत मान्यताही दिली होती. परंतु, अखेर चार महिन्यांनी शेळके यांना आयुक्त गोविंद बोडके यांनी नियुक्तीचे पत्रक दिले असून, लवकरच ते या रिक्तपदाचा पदभार घेतील.

केडीएमसीचे सचिव आणि उपसचिवपद २००७ पासून रिक्त आहे. सचिवपदाचा कार्यभार सध्या उद्यान अधीक्षक संजय जाधव हे प्रभारी म्हणून हाताळत आहेत. परंतु, पहिले उपसचिव सुधीर जोशी यांनी २००७ मध्ये घेतलेल्या स्वेच्छानिवृत्तीनंतर हे पद आजतागायत भरलेले नव्हते. २०११ मध्ये उपसचिवपदासाठी परीक्षा आणि मुलाखती घेण्यात आल्या होत्या. यासाठी पाच उमेदवार रिंगणात होते. परंतु, पुढे त्यांचे काय झाले, याचे कोडे अद्याप उलगडलेले नाही. दरम्यान, त्यानंतर पुन्हा प्रशासनाने उपसचिवपद भरण्याबाबत कार्यवाही सुरू केल्याने उपसचिव मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

सामान्य प्रशासन विभागाकडून या पदासाठी १८ डिसेंबर २०१६ ला लेखी परीक्षा घेण्यात आली. या पदासाठी एकूण १७ उमेदवारांचे अर्ज आले होते. यातील १४ उमेदवारांनी परीक्षा दिली होती. यात २०० मार्कांच्या परीक्षेत केडीएमसीचे शेळके यांना सर्वाधिक ११८ गुण मिळाले आहेत. शेळके यांची महापालिकेत २३ वर्षे सेवा झाली आहे. बोडके यांच्या स्वाक्षरीनंतर उपसचिवपद नियुक्तीचा प्रस्ताव जूनमध्ये पार पडलेल्या महासभेत ठेवला गेला होता. त्याला त्यावेळीच महासभेची मान्यता मिळाल्याने शेळके लवकरच उपसचिवपदाचा पदभार स्वीकारतील, असा अंदाज होता. परंतु, आयुक्तांकडून नियुक्तीपत्र देण्यासाठी नोव्हेंबर उजाडला. मधल्या काळात विधानसभा निवडणुकीमुळे हा विलंब झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, चार महिन्यांनी का होईना शेळके यांना उपसचिवपदावर नियुक्ती केल्याचे पत्र देण्यात आले आहे.सचिवपदही कायमस्वरुपी भरावेकेडीएमसीचे पहिले सचिव चंद्रकांत माने हे डिसेंबर २००७ मध्ये निवृत्त झाले. त्यानंतर, आतापर्यंत सचिवपद कायमस्वरूपी भरण्यात आलेले नाही. सध्या सचिवपदी संजय जाधव यांची प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे उद्यान अधीक्षकपदाचा पदभारही आहे. उपसचिवपद नियुक्तीनंतर महत्त्वाचे मानले जात असलेले सचिवपद कायमस्वरूपी भरण्याकडे प्रशासनाने लक्ष घालावे, अशीही मागणी आता होत आहे. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाthaneठाणे