शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरांना शुल्क भरण्यासाठी केडीएमसीची सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 01:14 IST

स्थायीची ठरावाला मंजुरी; तीन टप्प्यांत भरण्याची मुभा

कल्याण : केडीएमसी हद्दीतील अधिकृत बिल्डरांना स्टेअरकेस अधिमूल्य व विकासशुल्क भरण्यात सवलत द्यावी, अशी मागणी ‘एमसीएचआय’ या बिल्डर संघटनेने मनपाकडे केली होती. मनपाच्या स्थायी समितीने शुल्क भरण्यास सवलत देण्याच्या ठरावाला नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यामुळे बिल्डरांना दिलासा मिळाला आहे.केडीएमसीला बिल्डरांकडून विकासशुल्कापोटी मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. मात्र, यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास ४३ कोटी रुपये कमी मिळाले आहेत. तसेच बांधकाम परवानगीसाठी मनपा प्रशासनाकडे आलेल्या प्रस्तावांची संख्याही कमी आहे. मनपाने केवळ १७ बांधकामांच्या प्रस्तावांना सात महिन्यांत परवानगी दिली आहे.विकासशुल्क व स्टेअरकेस प्रीमियम भरण्यासाठी अन्य महापालिकांच्या धर्तीवर केडीएमसीने सवलत द्यावी. एकूण रकमेपैकी ४०, ३० आणि ३० टक्के रक्कम तीन टप्प्यांत भरण्याची मुभा प्रशासनाने द्यावी, अशी मागणी एमसीएचआयचे अध्यक्ष श्रीकांत शितोळे व माजी अध्यक्ष रवी पाटील यांनी केली होती. त्यामुळे प्रशासनाने तसा प्रस्ताव स्थायी समितीत सादर केला होता.सप्टेंबरमध्ये या प्रस्तावाला सदस्यांनी आक्षेप घेतल्याने प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आला होता. मात्र, नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सभापती विकास म्हात्रे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.मोकळ्या जागेवरील कराची वसुली बाकीकेडीएमसीने शुल्क भरण्यास सूट दिल्याने बिल्डर त्यांचे बांधकाम परवानगीचे प्रस्ताव सादर करतील. तसेच शुल्क भरण्याचे प्रमाण वाढू शकते. त्यातून मनपाला उत्पन्न मिळू शकते.प्रशासनाने यापूर्वीही बिल्डरांना मोकळ्या जागेवरील करात सूट दिली होती. मात्र, त्यांच्याकडून थकबाकीपोटी मोकळ्या जागेवरील कराची रक्कम वसूल होणे बाकी आहे.मात्र, आता कोरोनामुळे बांधकाम व्यवसायाला मोठा फटका बसला असल्याने थकबाकी वसुली कमी होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका