शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसी आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

By admin | Updated: December 22, 2016 06:02 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावरील याचिकेवर राष्ट्रीय हरित लवादापुढे बुधवारी पहिली

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावरील याचिकेवर राष्ट्रीय हरित लवादापुढे बुधवारी पहिली सुनावणी झाली. यावेळी लवादाने महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांना १० जानेवारीला होणाऱ्या पुढील सुनावणीस हजर राहण्याचे आदेश दिले. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतून दररोज ६४० मेट्रीक टन घनकचरा गोळा केला जातो. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच डम्पिंग खाडी व नदीकिनाऱ्यापासून लांब असले पाहिजे. मात्र, आधारवाडी डम्पिंग खाडीजवळ आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ते बंद करण्याचा आदेश दिला आहे. शिवाय, त्याची क्षमताही संपली आहे.आधारवाडी डम्पिंग बंद करून घनकचरा व्यवस्थापनाच्या नियमावलीची अंमलबजावणी करावी, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. महापालिकेने २००० मधील या नियमावलीचे उल्लंघन केले आहे. प्रकल्पही उभारलेला नाही. न्यायालयाने फटकारल्यावरही महापालिकेची कार्यवाही संथगतीनेच सुरू आहे. मागील दीड वर्षापासून महापालिका केवळ आधारवाडी डम्पिंग शास्त्रोक्त पद्धतीने बंद करून बारावे व मांडा येथे भरावभूमी क्षेत्र विकसित करण्यासाठी निविदा मागवत आहेत. जवळपास ११ वेळा फेरनिविदा मागवूनदेखील त्याला प्रतिसाद मिळत नाही. आता प्रतिसाद मिळाला आहे. तो विषय स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. दरम्यान, यासंदर्भातील याचिका उच्च न्यायालयाकडून हरित लवादाकडे वर्ग झाली आहे. त्याची पहिली सुनावणी बुधवारी झाली. त्यावेळी लवादाने आयुक्त रवींद्रन यांनी १० जानेवारी रोजीच्या सुनावणीस हजर राहण्याचे आदेश दिले आहे. घनकचरा प्रकल्प सुरू करण्यासाठी आतापर्यंत काय केले, त्यातून आतापर्यंत काय झाले, याचा अहवालच आयुक्तांना १० जानेवारीला लवादासमोर सादर करावा लागणार आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीच्या आधारे राज्याचे प्रधान सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी लवादासमोर प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यात कल्याण-डोंबिवलीतील घनकचरा प्रकल्प व मलनि:सारण प्रकल्प मे २०१७ अखेरपर्यंत पूर्ण करण्याची डेडलाइन दिली आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे आयुक्त पुन्हा १० जानेवारीच्या सुनावणीत काय माहिती देतात, हे त्यादिवशीच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, लवादाने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केडीएमसीच्या घनकचरा प्रकल्पाविषयी सद्य:स्थिती अहवाल मागवला होता. मंडळाने तो अहवाल लवादाला सादर केला आहे. या अहवालानुसार महापालिकेने आधारवाडी डम्पिंग न्यायालयाच्या आदेशानंतर बंद केलेले नाही. केवळ बंद करण्यासाठी निविदा मागवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच डम्पिंग बंद करून इतर जागेवर ते विकसित करावयाचे आहे. त्याठिकाणी त्या जागाही विकसित केलेल्या नाहीत. प्रकल्पही उभारलेला नाही. त्यामुळे त्याठिकाणच्या नागरिकांना कचऱ्याच्या दुर्गंधीसह कचऱ्याला लागणाऱ्या आगीचा त्रास सहन करावा लागत आहे. (प्रतिनिधी)