शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीत इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट थंडावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 00:50 IST

पालिकेने काम करायला सांगूनही नंतर मानधन थकवल्याने कल्याण-डोंबिवलीतील स्ट्रक्चरल आॅडिटचे काम थंडावले आहे. हे काम थांबूनही पालिका काहीही हालचाल करत नसल्याने त्यांना इमारतीची सुरक्षा आणि रहिवाशांच्या जिवाची काळजी नसल्याची टीका प्रसिद्ध बांधकाम सल्लागार माधव चिकोडी यांनी केली.

अनिकेत घमंडीडोंबिवली : पालिकेने काम करायला सांगूनही नंतर मानधन थकवल्याने कल्याण-डोंबिवलीतील स्ट्रक्चरल आॅडिटचे काम थंडावले आहे. हे काम थांबूनही पालिका काहीही हालचाल करत नसल्याने त्यांना इमारतीची सुरक्षा आणि रहिवाशांच्या जिवाची काळजी नसल्याची टीका प्रसिद्ध बांधकाम सल्लागार माधव चिकोडी यांनी केली. घाटकोपरची इमारत दुर्घटना आणि ३० वर्र्षे जुन्या इमारतीला स्ट्रक्चरल आॅडिट सक्तीचे करण्याच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.पाहणीदरम्यान बांधकाम सल्लागारांनी सुचवलेल्या सूचनांचे पालन करणे, त्याची पूर्तता झाली की नाही याचा आढावा घेणे आवश्यक असते. पण नव्या बांधकामांव्यतिरिक्त बहुतांश इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट होत नाही. ते तपासणारा स्वतंत्र विभाग नाही. पालिकेने २०१२ मध्ये बांधकाम सल्लागारांचे पॅनल नेमले, मग दोन वर्षात ही मोहीम का थंडावली? असा सवाल त्यांनी केला.या पॅनेलमधील सल्लागारांना पहिल्या वर्षी शंभर, दुसºया वर्षी ६० इमारतींचे आॅडिट करण्यास सांगितले. नंतर ही मोहीम बंद पडली. त्यात सातत्य हवे. अन्यथा नागरिकांचे नाहक बळी जातील. त्याला कोण जबाबदार? प्रत्येक जण हात वर करणार असेल तर अशा बांधकामांचे करायचे तरी काय? असा प्रश्न चिकोडी यांनी उपस्थित केली.बिले थकवलीज्यावेळी हे पॅनल नेमले गेले, तेव्हा आॅडिट करतांना प्रत्येक इमारतीमागे विशिष्ट रक्कम फी म्हणून आकारावी, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार पॅनलमधील बांधकाम सल्लागारांनी कामानंतर पालिकेला बिले दिली. चिकोडी यांनीही सुमारे ३.५ लाखांचे बिल दिले होते. पण अद्याप पालिकेने ते दिलेले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. विविध तांत्रिक कारणांमुळे बिले थकवल्याने पॅनलमधील सदस्य काम करण्यासाठी तयार होत नसल्याचे त्यांनी सांगितले.सावरकर सभागृह छताचा प्रश्नपालिकेच्या सावरकर सभागृहाचे छत कोसळले. त्यानंतर तिघा बांधकाम सल्लागारांनी अधिकाºयांसमवेत त्या ठिकाणी पाहणी केली. ही घटना कशी घडली, का घडली, त्याची कारणे यावर चर्चा झाली. १५-१६ वर्षांपूर्वी जे काम झाले होते, त्यातील त्रुटी आता काढण्यात काय अर्थ आहे, तशा चुका होणार नाहीत याची काळजी घेत पुढे जाऊ असे अधिकाºयांना सांगितले. तरीही वरिष्ठांनी त्याकडे कानाडोळा करत ज्यातून काही निष्पन्न होणार नाही, असा दोष देण्याचा प्रयत्न सुरू केल्याने यामागे काही ‘उद्देश’ आहे का? अशी सूचक प्रतिक्रिया चिकोडींनी दिली.चाळींचे बांधकाम सदोषडोंबिवली परिसरात अनेक कानाकोपºयांत मोठ्या प्रमाणात चाळी उभारल्या जात आहेत. त्यांचे बांधकाम तकलादू आहे. त्यात घरे घेणाºयांची सुरक्षा वाºयावर आहे. एखाद्यावेळी पूरसदृश्य परिस्थिती ओढवली, तर या चाळींतील घरे पाण्यावर तरंगतील, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नसल्याचे ठाम मत चिकोडी यांनी व्यक्त केले. या बांधकामांची चौकशी व्हायला हवी. पण आजवर पालिकेने तशी चौकशी कधीही केली नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.पॅनेल जरी महापालिकेने केलेले असले, तरी ज्या इमारतींची पाहणी करायला सांगितली होती त्या इमारतधारकांनीच या आॅडिटची फी संबंधितांना द्यायला हवी होती. या बांधकाम सल्लागारांचे पॅनल पुन्हा कसे कार्यान्वित होऊ शकेल आणि स्ट्रक्चरल आॅडिट मार्गी लावण्याबाबत बोलणी सुरु आहेत.- राजेंद्र देवळेकर,महापौर