शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘केडीएमसी’ला हरित लवादाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 02:49 IST

एमआयडीसीतील आजदे तलावाच्या प्रदूषणासंदर्भात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या नियमावलीचे पालन करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने केडीएमसीला दिले आहेत.

डोंबिवली : एमआयडीसीतील आजदे तलावाच्या प्रदूषणासंदर्भात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या नियमावलीचे पालन करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने केडीएमसीला दिले आहेत. लवादाचा हा आदेश राज्यातील सगळ्याच महापालिकांना मार्गदर्शक ठरणारा आहे.आजदे तलावात गणपती व देवीच्या मूर्ती विसर्जित केल्याने तलाव प्रदूषित होतो, म्हणून डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनने हरकत घेतली होती. हा तलाव नैसर्गिक पाझर तलाव आहे. त्याचे पाणी प्रदूषित झाल्याने त्यातील मासे, कासवे मरण पावली आहे. स्थानिक नागरिक राजू नलावडे यांनी प्रदूषण मंडळ व एमआयडीसीकडे पाठपुरावा केला होता. २०१६ च्या गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात तसेच २०१७ सालच्या जानेवारीत माघी गणेशोत्सवात सुमारे हजार गणेशमूर्ती विसर्जित केल्याची तक्रार करण्यात आली होती. तलाव किती प्रदूषित झाला आहे, याची तपासणी केली असता तलावाच्या पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण शून्य आढळले होते. या अहवालानंतरही प्रदूषण मंडळाने उडवाउडवीची उत्तरे दिली होती. या पाठपुराव्यानंतर असोसिएशनने हरित लवादाकडे याचिका दाखल केली गेली. या याचिकेवर ११ आॅगस्टला सुनावणी झाली. मूर्तीचे विसर्जन कशा प्रकारे करावे, यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिली आहेत. त्यानुसार, या तलावात मूर्तींचे विसर्जन करू नये व पालिकेने विसर्जनाची पर्यायी व्यवस्था करावी. कृत्रिम तलावाची निर्मिती करावी. मूर्ती विसर्जनानंतर गाळ, निर्माल्य काढावेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने विसर्जनापूर्वी, विसर्जनाच्या वेळी आणि विसर्जनानंतर पाण्याचे नमुने घ्यावेत. या पाण्यातील बायोलॉजिकल आॅक्सिजन डिमांड, केमिकल आॅक्सिजन डिमांड, टोटल सॉलिड अ‍ॅण्ड मेटल अर्थात क्रोमाइम, लीड, झिंक, कॉपर यांचे प्रमाण तपासावे. त्याचे निष्कर्ष वेबसाइटवर टाकवेत. लवादाच्या आदेशाची अवहेलना होणार नाही, यासाठी सहकार्य करण्याची मागणी असोसिएशनच्या पदाधिकारी वर्षा महाडिक, अर्चना पाटणकर, रश्मी येवलेयांनी आयुक्त पी. वेलारासू यांच्याकडे केली आहे. महापालिका हद्दीत सात तलाव आहेत. या सगळ्याच तलावांत विसर्जन होत नाही. कल्याण पूर्वेला कृत्रिम विसर्जन तलाव तयार केला जातो. डोंबिवलीत रोटरी क्लबतर्फे कृत्रिम तलाव तयार केला जातो. दरम्यान लवादाच्या आदेशाचे पालिका कितपत पालन करते व त्यांच्याकडून पालन झाले नाही, तर लवाद पालिकेवर काय कारवाई करतो, याकडे असोसिएशनचे लक्ष लागले आहे.