शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसी प्रशासन धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 02:21 IST

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केले जाणारे नियोजन हे ठोस कृतीअभावी कागदावरच राहत असल्याचा आरोप शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी केला.

कल्याण : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केले जाणारे नियोजन हे ठोस कृतीअभावी कागदावरच राहत असल्याचा आरोप शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी केला. नियोजन आणि सुविधांअभावी गणेशभक्तांना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याकडे या वेळी लक्ष वेधण्यात आले. यावर तातडीने नियोजनाच्या दृष्टीने तयारी करावी, सदस्यांच्या सूचना कागदावरच न ठेवता त्याबाबत कृती व्हावी, असे आदेश सभापती रमेश म्हात्रे यांनी प्रशासनाला दिले.गणेशोत्सव जवळ आल्याने महापालिकेने कोणते नियोजन केले आहे, असा सवाल सभा सुरू होण्यापूर्वी भाजपा सदस्य विकास म्हात्रे यांनी केला. मागील वर्षी आपल्या प्रभागातील गणेशघाटावर कोणत्याही सुविधा नव्हत्या, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. गणेशमूर्ती विसर्जन करणारी चार मुले वाहून गेली होती. परंतु, त्यांना पोहता येत असल्याने त्यांचा जीव वाचला. तेथे बोटींची व्यवस्थाही महापालिकेने केलेली नव्हती, तसेच अग्निशमन दलाचे जवानही कोणतीही साधने नसल्याने नुसते बघ्याची भूमिका घेत होते, असेही म्हात्रे म्हणाले.यावर सभापती रमेश म्हात्रे यांनी अग्निशमन दलाचे अधिकारी सुधाकर कुलकर्णी यांना विचारणा करताच त्यांनी मागील वर्षी ५२ ठिकाणच्या विसर्जनस्थळी अग्निशमन दलाचे जवान नेमले होते. परंतु, मनुष्यबळाअभावी सर्वच ठिकाणी कर्मचारी देणे शक्य झाले नाही. यंदा १०० स्वयंसेवकांची नेमणूक केली जाणार आहे, तसेच अस्तित्वात असलेल्या बोटींव्यतिरिक्त आणखी चार बोटी घेतल्याने या वेळेस गैरसोय होणार नाही, असे त्यांनी सांगितले. या स्वयंसेवकांची माहिती नाव आणि फोटोसह द्या, अशा सूचना सभापती म्हात्रे यांनी या वेळी महापालिका प्रशासनाला केल्या.