शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ सर्वेक्षणामध्ये केडीएमसीचा ९७ वा नंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 01:09 IST

केंद्रीय स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, केडीएमसीचा चार हजार शहरांच्या स्पर्धेतून ९७ वा क्रमांक आला आहे.

कल्याण : केंद्रीय स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, केडीएमसीचा चार हजार शहरांच्या स्पर्धेतून ९७ वा क्रमांक आला आहे. महापालिकेस चार हजार गुण मिळाल्याने अधिकारी समाधान व्यक्त करत आहेत. दरम्यान, आता महापालिकेने पहिल्या पन्नासमध्ये येण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.२०१६ मधील स्वच्छ सर्वेक्षणात ७७ शहरांमधून महापालिकेचा क्रमांक ६७ वा आला होता. शेवटून १० वा क्रमांक आल्याने महापालिकेवर टीका झाली होती. २०१७ मध्ये ७७ शहरांऐवजी ४०० शहरांमधून हे सर्वेक्षण घेतले गेले. त्यावेळी महापालिकेचा २३४ वा क्रमांक आला होता. त्यामुळे कल्याण-डोंबिवली ही अस्वच्छ शहरे आहेत, असा शिक्का या शहरांवर बसला होता.कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प न उभारल्याने केडीएमसीचा २०१६ व २०१७ च्या स्वच्छ सर्वेक्षणात नंबर घसरला होता. तसेच जैव वैद्यकीय प्रकल्प सुरू झालेले नव्हता. आधारवाडी डम्पिंगचा प्रश्नही गाजत होता. त्यामुळे महापालिकेस गुण कमी मिळाले. त्यानंतर महापालिकेने उंबर्डे व बारावे येथे घनकचरा प्रकल्प सुरू करण्यासाठी निविदा काढून ती मंजूर केली. तसेच आधारवाडी डम्पिंगवरील कचरा प्रक्रियेसाठी सयंत्रणा सुरू केली. त्यामुळे बºयापैकी सकारात्मक कृती होत असल्याचे सर्वेक्षण समितीच्या नजरेस आले.या वेळच्या सर्वेक्षणाची नियमावलीही बदली होती. यंदाच्या सर्वेक्षणात ३५ टक्के गुण फिडबॅकला होते. ३५ टक्के गुण सर्वेक्षण करणाºया व्यक्तींकडून दिले जाणार होते. तसेच ३० टक्के गुण हे महापालिकेचे प्रयत्न काय आहेत, याला होते. एका अ‍ॅप्सद्वारे फिडबॅक घेतला गेला. कचºयाचा फोटो टाकून तो कळविला जात होता. त्याठिकाणी स्वच्छता केली जात होती. फिडबॅक चांगला मिळाल्याने गुणही वाढले. त्यामुळे शंभरच्या यादीत महापालिकेचा समावेश झाला आहे. यंदा चालू वर्षी पुन्हा नव्याने मार्गदर्शक नियमावली येऊ शकते. त्यासाठी महापालिका तयार आहे. नव्या सर्वेक्षणात पहिल्या पन्नासमध्ये महापालिका येण्यासाठी प्रयत्न करेल, असा दावा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी केला आहे.