शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीचे ११ हजार विद्यार्थी गणवेशाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: July 16, 2015 23:04 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण मंडळ सभापतींसह सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर अंकुश नसल्याने आणि विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर वचक नसल्याने यंदाही ७४ शाळांमधील

- अनिकेत घमंडी, डोंबिवलीकल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण मंडळ सभापतींसह सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर अंकुश नसल्याने आणि विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर वचक नसल्याने यंदाही ७४ शाळांमधील ११ हजार विद्यार्थ्यांना पहिल्याच महिन्यात शैक्षणिक साहित्य मिळाले तर नाहीच, उलट त्यासाठी आणखी महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती समोर येत आहे. महापालिकेच्या शाळा १६ जूनपासून सुरू झाल्या असून अद्यापही साहित्य मिळालेले नाही. वेळच्या वेळी शैक्षणिक साहित्य मिळावे, यासाठी मंडळाच्या माध्यमातून त्यासंदर्भातील निविदांनाही ३० एप्रिलच्या सभेत मंजुरी देण्यात आली. तरीही मे महिना उलटण्याआधी दोन दिवस टेंडर काढल्याने प्रशासनासह सत्ताधाऱ्यांवर ही नामुष्की येणार असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. सभापतींवर अविश्वासाचा ठराव आणावा, अशी मागणी मंडळाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य धनंजय कांबळे यांनी केली होती. प्रशासन काही ना काही कारणे सांगून चालढकल करत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्याला सर्वस्वी सभापती शांताराम पवार जबाबदार असल्याचा आरोप आहे.प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांवर ही वेळ आली आहे. त्यांना लवकरात लवकर ते साहित्य देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे शिक्षण मंडळ सदस्य शशिकांत कांबळे यांनी सांगितले.आगामी १० दिवसांत विद्यार्थ्यांना रेनकोट तसेच १५ दिवसांत वह्या मिळण्याची शक्यता आहे. गणवेशासाठी मात्र महिना-दीड महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. - सुरेश आवारी, प्रशासन अधिकारी, केडीएमसी शिक्षण मंडळ