शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या कासारवडवली पोलिसांनी चिमुकलीला मिळवून दिले आई बाबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 00:30 IST

ठाण्यातील आझादनगर येथून वाट चुकल्यामुळे घरापासून दुरावलेल्या चार वर्षीय मुलीला पुन्हा तिच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यात कासारवडवली पोलिसांना गुरुवारी रात्री यश आले. पोलिसांनी तत्परता दाखवून मुलीला परत मिळवून दिल्याबद्दल या पालकांनी समाधान व्यक्त केले.

ठळक मुद्दे अवघ्या अर्ध्या तासातच घेतला शोध आझादनगर येथून वाट चुकल्याने उडाला गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: आझादनगर येथून वाट चुकल्यामुळे घरापासून दुरावलेल्या चार वर्षीय मुलीला पुन्हा तिच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यात कासारवडवली पोलिसांना गुरुवारी रात्री यश आले. एका वाटसरुने तिला ताब्यात दिल्यानंतर मोठया कौशल्याने कासारवडवली पोलिसांनी तिच्या आई वडिलांचा शोध घेऊन तिला त्यांच्या स्वाधीन केले.घोडबंदर रोड येथील आझादनगर, ब्रम्हांड येथे एक चार वर्षीय चिमुकली रस्त्याच्या कडेला रडत असल्याचे एका वाटसरुला १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आढळले. तिला तिच्या आई बाबांबद्दल काहीच माहिती सांगता येत नव्हती. अखेर त्याने तिला कासारवडवली पोलिसांच्या ताब्यात दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शीतल चौगुले, महिला कॉन्स्टेबल फुुफाणे, बीट मार्शल पोलीस नाईक दरेकर आणि घुगे यांनी तिच्या फोटोसह माहिती सोशल मिडियावर प्रसारित केली. त्यानंतर ती ज्या परिसरात मिळाली, त्या भागात तिच्या आई वडिलांचा शोध घेतला. अनेक नागरिकांकडे केलेल्या चौकशीनंतर अखेर अर्ध्या तासांनी या पथकाने तिच्या पालकांचा शोध घेतला. नंतर तिच्या पालकांना पोलीस ठाण्यात पाचारण करुन अखेर तिचे वडील आणि आजी यांच्या ताब्यात तिला दिले. मुलगी सुखरुप मिळाल्यानंतर तिच्या आजीने तिला जवळ कवटाळले. पोलिसांनी तत्परता दाखवून मुलीला परत मिळवून दिल्याबद्दल या पालकांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMissingबेपत्ता होणं