शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

वर्तकनगरमध्ये सफाई कामगाराची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 05:34 IST

वर्तकनगर-भीमनगर भागातील एका सार्वजनिक शौचालयाच्या बाहेर अनिल गाडेकर (२७) या सफाई कामगाराची हत्या केल्याची घटना सोमवारी पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान घडली.

ठाणे : वर्तकनगर-भीमनगर भागातील एका सार्वजनिक शौचालयाच्या बाहेर अनिल गाडेकर (२७) या सफाई कामगाराची हत्या केल्याची घटना सोमवारी पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान घडली. वर्तकनगर पोलीस अनोळखी मारेकऱ्यांचा शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.पोखरण रोड क्रमांक-२ भागातील रेप्टाकोर्स कंपनीमध्ये अनिल हा सफाई कामगार आहे. तो रविवारी रात्री ९.३० वा.च्या सुमारास दारूच्या नशेतच भीमनगर येथील त्याच्या घरी परतला होता. त्यानंतर थेट पहाटे ४ वा.च्या सुमारास तो सार्वजनिक गणपती मंडपासमोरील मोकळ्या जागेत रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे परिसरातील काही महिलांनी त्याची बहीण मनीषा वाघमारे (२०) आणि आई कौशल्या गाडेकर (६०) यांना सांगितले. त्याच्या गळ्यावर वार केल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. त्याला पोलिसांच्या मदतीने तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, रक्तस्रावामुळे रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्याची हत्या नेमकी कोणत्या कारणासाठी आणि कोणी केली, याचा तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांनी सांगितले. वर्तकनगर पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागाकडूनही या प्रकरणाचा समांतर तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.