शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
2
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
6
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
7
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
8
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
9
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
10
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
11
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
12
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
13
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
14
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
15
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
16
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
17
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
18
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
19
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
20
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा

खाडीकिनाऱ्यांवरील १६०० हेक्टरवरील कांदळवन आता पुन्हा बहरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 04:16 IST

न्यायालयाच्या निर्णयामुळे मिळणार दिलासा; रेतीमाफियांना चाप बसण्याची शक्यता

- सुरेश लोखंडेठाणे : नवी मुंबई, ठाणे, घोडबंदर, नागलाबंदर, मीरा-भार्इंदर, भिवंडी, दिवा, कळवा, मुंब्रा आदी ठिकाणच्या खाडीकिनारी सुमारे एक हजार ६०८ हेक्टर क्षेत्रावर कांदळवन, खारफुटी आणि तिवरांचे जंगल आहे. सततच्या कत्तलीनंतरही काही कांदळवने तग धरून आहेत. काही ठिकाणी जिल्हा प्रशासनाने लक्ष केंद्रित करून सुमारे ७२ जणांवर फौजदारी गुन्हे दाखल केले. आता मुंबई उच्च न्यायालयाने सक्त ताकीद दिल्यामुळे कांदळवनाची वाढ होऊन ते बहरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.समुद्र, खाडीकिनारी उद्भवणाºया त्सुनामीच्या संकटापासून कांदळवन व तिवरांच्या जंगलामुळे बचाव होतो. यामुळे त्यांचा ºहास होऊ न देता त्यांचे संरक्षण करण्याचे न्यायालयीन आदेश आहेत. सोमवारी पुन्हा त्यावर शिक्कामोर्तब होऊन कांदळवन, तिवरांच्या झाडांना सक्तीने वाढवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. यामुळे जिल्हा प्रशासन कामाला लागले. रेतीच्या हव्यासापोटी रेतीमाफियांनी ठिकठिकाणचे कांदळवन नष्ट करून मनसोक्त रेती उत्खनन केली. यामुळे दिवाखाडीसह, मुंब्रा, कोपर, कळवा आदी खाडीकिनारे ओस पडले आहेत. कांदळवन नष्ट झाल्यामुळे या खाडीचे पाणी रेल्वे रुळांपर्यंत पोहोचल्याचे वास्तव आहे.ठिकठिकाणच्या खाडीकिनारी दोन हजार हेक्टरपेक्षा क्षेत्रावर कांदळवन-तिवरांची झाडे आहेत. पण रेती काढण्यासाठी अडथळा ठरणाºया या तिवराच्या झाडांसह कांदळवनाच्या बुंध्याशी केमिकल्स टाकून रेतीमाफियांनी ते नष्ट केले. यामुळे काही ठिकाणचे खाडीकिनारे पूर्णपणे ओसाड झाले. त्यावर भरतीचे पाणी शिरून या मोकळ्या ठिकाणी गाळ साचला. मात्र या गाळातूनही नष्ट केलेले तिवरांच्या झाडांचा बुंधा, लाकूडतोड करून अस्तित्वाची जाणीव करून देताना दिसून येत आहे. प्रशासनाकडे सुमारे एक हजार ६०८ हेक्टर क्षेत्रावरील कांदळवनाची नोंद आढळते. पण सुमारे दोन हजार हेक्टरपेक्षा जास्त कांदळवन, तिवरांचे क्षेत्र जिल्ह्यात असल्याचे जाणकारांकडून कळते. या वनाच्या संवर्धनासाठी न्यायालयीन आदेशानंतर राजपत्रातदेखील वनसंवर्धन घोषित करण्यात आले होते. सोमवारी याचिकेवर न्यायालयात सुनावणी होऊन प्रशासनावर न्यायालयाने जोरदार ताशेरे आढले. कांदळवनाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाच्या आधीच कांदळवन किंवा पाणथळ जागेचा नाश करणाºया सुमारे ६० जणांवर तत्कालीन ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी गुन्हे दाखल केले होते. यात नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, मीरा-भार्इंदर या भागातील कांदळवन व जागा नाश करणाºयांचा समावेश आहे.भिवंडी तालुक्यात शासकीय जमिनीवरील कांदळवन व्याप्ती सुमारे १३७ हेक्टरची आहे. ती वन संरक्षित करण्यासाठी प्रस्तावित आहे. ठाणे तालुक्यातील शासकीय जमिनीवर सुमारे १,४७१ हेक्टर क्षेत्रावर कांदळवन आहे. त्याची अधिसूचना वर्षापूवीच काढण्यात आली होती.याशिवाय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कांदळवन संरक्षण समिती स्थापन झालेली आहे. सतत होणारा ºहास थांबविण्यासाठी या कांदळवनाच्या क्षेत्रास राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित करण्याची प्रारूप अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्धही झाली आहे.या अधिसूचनेमध्ये वाशी, तळवली, सारसोळे, नेरूळ, घणसोली, जुहू, तुर्भे, कोपरखैरणे, गोठवली, सोनखार, शहाबाज, दिवे, करावे आणि ऐरोली या गावांमधील कांदळवन जमिनीचा समावेश झाला आहे. वनसंवर्धनासाठीच्या याचिकेमध्ये न्यायालयाने जोरदार ताशेरेही ओढले होते.

टॅग्स :thaneठाणे