शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत विविध संस्थांचे ठिकठिकाणी कॅन्डल मार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:32 IST

भिवंडी : उन्नाव,कटवा,सासाराम,सुरत येथे झालेल्या बलात्काराच्या घटनांचा निषेध करण्यासाठी शहरातील विविध ठिकाणाहून रात्रीच्या सुमारास कॅन्डल मार्च काढण्यात आला.या कॅन्डलमार्च मध्ये शेकडोंच्या संख्येने स्त्रि-पुरूष सहभागी झाले होते.महानगरपालिकेच्या समोर भिवंडी काँग्रेस कमिटीच्या वतीने देशांतील विविध ठिकाणी झालेल्या बलात्काराच्या निषेधार्थ रात्री ९ वाजताच्या सुमारास कॅण्डल मार्च काढण्यात आला.हा कॅण्डल मार्च आनंद दिघे चौकातून पुढे ...

ठळक मुद्देभिवंडी काँग्रेस कमिटीच्या मंचावरून महिलांना भाषणांची संधीकाँग्रेसच्या कॅण्डलमार्च मध्ये मोठ्या संख्येने महिला पुरूष सहभागीकाँग्रेस,मनसे व तंजीम उलेमा यांचा भिवंडीत कॅण्डल मार्च

भिवंडी : उन्नाव,कटवा,सासाराम,सुरत येथे झालेल्या बलात्काराच्या घटनांचा निषेध करण्यासाठी शहरातील विविध ठिकाणाहून रात्रीच्या सुमारास कॅन्डल मार्च काढण्यात आला.या कॅन्डलमार्च मध्ये शेकडोंच्या संख्येने स्त्रि-पुरूष सहभागी झाले होते.महानगरपालिकेच्या समोर भिवंडी काँग्रेस कमिटीच्या वतीने देशांतील विविध ठिकाणी झालेल्या बलात्काराच्या निषेधार्थ रात्री ९ वाजताच्या सुमारास कॅण्डल मार्च काढण्यात आला.हा कॅण्डल मार्च आनंद दिघे चौकातून पुढे हसिन टॉकीज मार्गे कापआळीतील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जाऊन मार्चचे विसर्जन करण्यात आले. या मार्चच्या सुरूवातीस काँग्रेस कमिटीच्या वतीने मनिषा मनोज म्हात्रे,अनुषा मसुना,रेहाना अन्सारी आदि महिलांनी भाषणे करून झालेल्या घटनेचा निषेध केला आणि अपराध्यांना फाशीची शिक्षा द्यावी,अशी मागणी केली आहे.  या मार्चमध्ये महापौर जावेद दळवी,प्रदेश सरचिटणीस प्रदिप रांका,शहराध्यक्ष शोअ‍ेब गुड्डू यांच्यासह पदाधिकारी व बहुसंख्य महिला सहभागी झाल्या होत्या.त्याचप्रमाणे आनंद दिघे चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देखील उन्नाव,कटवा,सासाराम,सुरत आदि ठिकाणी झालेल्या बलात्काराच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च काढण्यात आला. या प्रसंगी मनसे शहराध्यक्ष प्रदिप बोडके,मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष साळवी आदि मनसैनिक उपस्थित होते.तसेच तंजीम उलेमा ए अहिले सुन्नतच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देशांत बेटी बचाव नारा फोल ठरल्याचे सांगत भाजप सरकारचा निषेध केला. तसेच अपराध्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी,अशी मागणी करीत मौलाना युसूफ रजा यांच्या नेतृत्वाखाली कोटरगेट मजीद जवळ मेणबत्ती पेटवून या बलात्काराच्या घटनेचा निषेध केला.शहरातील जैतुनपुरा मंगळवार स्लॅबवर आसिफा प्रकरण व उन्नाव प्रकरणी न्याय मिळावा यासाठी रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत कॅण्डलमार्च काढण्यात आला.या मार्चचे नेतृत्व समीर मोमीन यांनी केले.शहरात ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या कॅण्डलमार्च मुळे रात्रीची वहातूक विस्कळीत झाली होती. शहरातील हे सर्व कार्यक्रम पुर्व नियोजीत असताना वहातूक पोलीस घटनास्थळी हजर नव्हते.त्यामुळे वाहनचालक बेशिस्तीने गाड्या चालवित होते. खाजगी व सरकारी बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना अर्धवट प्रवास संपवून मध्येच रस्त्यात उतरावे लागले. तर काही उत्साही तरूणांच्या दुचाकी चालविण्यामुळे छोटे-मोठे अपघात झाले. मात्र बंदोवस्तास असलेल्या पोलीसांनी वहातूक कोंडीकडे दुर्लक्ष केले.

टॅग्स :BhiwandiभिवंडीRapeबलात्कार