शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणच्या पोलीस उपायुक्तांचा गौरव

By admin | Updated: April 24, 2017 02:23 IST

कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे हे रत्नागिरी अधीक्षकपदी कार्यरत असताना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल

ठाणे : कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे हे रत्नागिरी अधीक्षकपदी कार्यरत असताना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना सहा लाखांच्या रोख रकमेचे पारितोषिक देऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी गौरवण्यात आले आहे. ‘प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा-२०१६’ याअंतर्गत राज्यस्तरांवरील गटात द्वितीय क्रमांक पटकावल्याने त्यांचा गौरव करण्यात आला आहे.उपायुक्त शिंदे यांनी लोकाभिमुख पोलीस प्रशासन कामगिरी करताना, मिडास टच कन्सल्टन्सी या संस्थेच्या माध्यमातून पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांची सकारात्मक मानसिकता निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील ६०० जणांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तसेच संकटग्रस्त जनतेसाठी तत्काळ पोलीस मदत मिळावी, यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे प्रतिसाद नावाचे अ‍ॅप तयार केले. सागरी हद्दीत सुरक्षा अधिक बळकट व परिणामकारक करण्यासाठी ई-बीट मार्शल पेट्रोलिंग कार्यरत केली. हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी बुरोंडी तालुका दापोलीत संमिश्र वस्तीचे व जातीयदृष्ट्या संवेदनशील पूर्वेतिहास असलेल्या गावांमध्ये अभिनव सामंजस्य करार ‘बुरोंडी पॅटर्न’ या नावाने केला. तसेच वाहतूक व्यवस्था व नियमनाबाबत २०१३-१६ या तीन वर्षांत जनजागृती केली. त्यामुळे अपघातांचे प्रमाण घटले, त्याचबरोबर कोंडी दूर करण्यासाठी आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी केली. याचबरोबर पोलीस प्रशासनांतर्गत सुविधांवर त्यांनी भर दिल्याने हा गौरव करण्यात आला. (प्रतिनिधी)