शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणकरांच्या झोपेचे खोबरे

By admin | Updated: June 2, 2016 01:21 IST

उकाड्याने हैराण झालेल्या कल्याण पश्चिमेतील नागरिकांच्या सहनशीलतेचा मंगळवारी अंत झाला. सतत दोन दिवस मध्यरात्री वीजपुरवठा खंडित झाल्याच्या निषेधार्थ शेकडो संतप्त

कल्याण : उकाड्याने हैराण झालेल्या कल्याण पश्चिमेतील नागरिकांच्या सहनशीलतेचा मंगळवारी अंत झाला. सतत दोन दिवस मध्यरात्री वीजपुरवठा खंडित झाल्याच्या निषेधार्थ शेकडो संतप्त नागरिकांनी पारनाका येथील ‘महावितरण’च्या कार्यालयाची तोडफोड केली. तसेच लालचौकी परिसरात ‘रास्ता रोको’ करून आपला संताप व्यक्त केला.मंगळवारी रात्री ११.३० च्या सुमारास पश्चिमेतील बहुतांश परिसरातील वीज गायब झाली. लालचौकी, गोल्डन पार्क, आधारवाडी, सुभाषनगर, श्री कॉम्प्लेक्स, रामबाग अशा मोठ्या परिसरातील वीजपुरवठा मध्यरात्री खंडित झाला होता. बराच वेळ उलटूनही वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांनी दूरध्वनीद्वारे ‘महावितरण’च्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तसेच ‘कस्टमर केअर सेंटर’ला फोन करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, या दोन्ही ठिकाणांहून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याची माहिती नागरिकांनी दिली. दरम्यान, दोन तास उलटूनही वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला. लालचौकी परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा जमाव गोळा झाला. या जमावाने रस्त्यात ठिय्या मांडून दोन्हीकडचा रस्ता रोखून धरला. काही संतप्त नागरिकांचा जमाव पारनाका येथील ‘महावितरण’च्या कार्यालयावर चालून गेला. त्या वेळी या कार्यालयात एकही कर्मचारी नसताना कार्यालयातील लाइट आणि पंखे चालूच होते. त्यामुळे आधीच संतप्त झालेल्या या जमावाचा पारा अधिकच चढल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. त्यामुळे या जमावाने कार्यालयात घुसून तोडफोड केल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)