शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-शिवसेनेच्या युतीवर कलानींचा प्रवेश अवलंबून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 00:46 IST

शिवसेनेचा पर्याय खुला : आमदार ज्योती कलानी यांना भाजपची नकारघंटा

सदानंद नाईक 

उल्हासनगर : भाजपवर कलानींचा शिक्का बसू नये आणि पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची नाराजी विचारात घेता, आमदार ज्योती कलानी यांच्या प्रवेशाला भाजपने नकार दिल्याची चर्चा शहरात रंगली. मात्र, निवडणुका जाहीर होण्यापूर्वी कलानी कुटुंब भाजपमय झालेले दिसेल, असा दावा कलानी समर्थकांनी केल्याने, कलानींच्या भाजप प्रवेशाबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

उल्हासनगरात कलानी कुटुंबाचे राजकीय अस्तित्व अबाधित राखण्यासाठी आमदार ज्योती कलानी, त्यांचा मुलगा ओमी कलानी आणि सून महापौर पंचम कलानी हे त्यांच्या गोटातील नगरसेवक आणि कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश घेणार असल्याची चर्चा गेल्या दोन महिन्यांपासून शहरात रंगली आहे. गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक असलेल्या कलानी कुटुंबाचा भाजपप्रवेश निश्चित समजला जात असला तरी, स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांच्या नाराजीकडे वरिष्ठांनी दुर्लक्ष केले नाही. शिवसेना-भाजपची युती झाल्यास पक्षाचा उमेदवार कलानी कुटुंबाच्या समर्थनाशिवाय निवडून येतो. पक्षाच्या वरिष्ठांना स्थानिक नेत्यांनी तशी माहिती दिली आहे. मात्र, युती न झाल्यास कलानी कुटुंबाचा प्रवेश निश्चित मानला जात आहे.

भाजप-शिवसेनेच्या युतीवर कलानी कुटुंबाचा प्रवेश अवलंबून असून, ज्योती कलानी यांच्या प्रवेशास भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नकार दिल्याची चर्चा सध्या शहराच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.पप्पू कलानी याच्या जन्मठेपेच्या शिक्षेत सूट व कुटुंबाचे राजकीय अस्तित्व कायम ठेवण्यासाठी पप्पू कलानी यांचा मुलगा ओमी कलानी यांनी ओमी टीमची स्थापना केली. त्यानंतर, भाजपने ओमी टीमसोबत आघाडी करून महापालिकेची सत्ता हस्तगत केली. ओमी कलानी यांची पत्नी पंचम या भाजपच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर महापौरपदी विराजमान झाल्या.राष्ट्रवादी संपल्यात जमाज्योती कलानी भाजपमध्ये गेल्यास शहरातील राष्ट्रवादीची ताकद संपून, हा पक्ष केवळ काही वॉर्डांपुरता मर्यादित राहणार आहे. कलानी कुटुंबाला आमदारकीची उमेदवारी मिळाल्यास आपले अस्तित्वच राहणार नसल्याची भीती भाजपच्या निष्ठावंत पदाधिकाºयांना सतावत असून, यातून ऐन निवडणुकीत पक्षामध्ये फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर उपाय म्हणून, कलानी कुटुंबाला विरोध करून स्वबळावर भाजपचा उमेदवार निवडून आणण्याची रणनीती स्थानिक पक्ष कार्यकर्त्यांनी आखल्याचेही बोलले जात आहे.युती न झाल्यास सेनेची उमेदवारीच्विधानसभा निवडणुकीत भाजप व शिवसेनेची युती न झाल्यास आणि कलानी कुटुंब भाजपमय न झाल्यास, शिवसेनेच्या तिकिटावर कलानी कुटुंबापैकी एकजण उमेदवार असू शकेल, अशीही चर्चा शहरात सुरू आहे.च्प्रत्यक्षात कलानी कुटुंब मात्र भाजप प्रवेशासाठी उत्सुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.आता युती होते अथवा नाही, झालीच तर कलानी कुटुंबाला प्रवेश मिळतो की नाही आणि त्याहीपेक्षा ज्योती कलानी, ओमी व पंचम यांच्यापैकी कोणाला आमदारकीचे तिकीट मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :thaneठाणे