शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणामध्ये विद्यार्थिनीचे कापले केस, भार्इंदरमध्येही महिलेचे केस कापल्याची घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 03:31 IST

कल्याण : पूर्वेतील गोविंदवाडी परिसरात राहणाºया १४ वर्षांच्या मुलीचे केस अनोळखी व्यक्तीने कापल्याची घटना शुक्रवारी रात्री ११.३० वाजता घडली. आठवीत शिकणारी ही मुलगी रात्री घरात अभ्यास करत असताना अचानक बेशुद्ध पडली. तिचे केस कापण्यात आल्याचे तिच्या भावाच्या निदर्शनास आले. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.कापलेले केस तिच्या शेजारीच पडलेले होते. तिच्या ...

कल्याण : पूर्वेतील गोविंदवाडी परिसरात राहणाºया १४ वर्षांच्या मुलीचे केस अनोळखी व्यक्तीने कापल्याची घटना शुक्रवारी रात्री ११.३० वाजता घडली. आठवीत शिकणारी ही मुलगी रात्री घरात अभ्यास करत असताना अचानक बेशुद्ध पडली. तिचे केस कापण्यात आल्याचे तिच्या भावाच्या निदर्शनास आले. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.कापलेले केस तिच्या शेजारीच पडलेले होते. तिच्या तोंडावर पाणी मारून भावाने तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. यापूर्वी डोंबिवलीतील पिसवली व कल्याण-मलंग रोडवर केस कापण्याच्या घटना घडल्या आहेत.भार्इंदरमध्येही महिलेचे केस कापल्याची घटनामीरा रोड : कांदिवली, नालासोपारा, भिवंडी आदी ठिकाणी महिलांचे केस कापण्याच्या घटनांनी खळबळ उडालेली असतानाच शनिवारी सकाळी भार्इंदरमधील गणेश देवलनगरात राहणाºया दशरथी लोध या महिलेचे केस कापल्याचा प्रकार उघडकीस आला.महिला चक्कर येऊन पडली व त्यामुळे तिच्यावर उपचार सुरू असल्याचे पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव यांनी सांगितले. पश्चिमेच्या गणेश देवलनगरमध्ये पती व दोन मुलांसोबत राहणारी दशरथी शनिवारी सकाळी ८ च्या सुमारास घराबाहेर भांडी धूत असताना तिला तिचे केस कापले गेल्याचे लक्षात आले आणि ते पाहून ती बेशुद्ध पडली. शेजाºयांनी तिला पालिकेच्या भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती स्थिर आहे.