शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण एसटी डेपो हटवणारच

By admin | Updated: April 21, 2016 02:23 IST

कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी करण्यासाठी स्टेशन परिसर मोकळा व्हावा, असा दावा करत रेल्वे स्थानकालगत मोक्याच्या जागी असलेला बस डेपोचा भूखंड ताब्यात घेण्याच्या प्रयत्नांना यश येऊ लागले आहे

कल्याण : कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी करण्यासाठी स्टेशन परिसर मोकळा व्हावा, असा दावा करत रेल्वे स्थानकालगत मोक्याच्या जागी असलेला बस डेपोचा भूखंड ताब्यात घेण्याच्या प्रयत्नांना यश येऊ लागले आहे. कर्मचारी-प्रवाशांचा विरोध डावलून हा डेपो तेथून हलवून शहराबाहेर नेण्याच्या भाजपाचे आमदार नरेंद्र पवार यांच्या मागणीला परिवहन राज्यमंत्र्यांनी पाठिंबा दिला आहे. त्या जागी डेपो पोर्ट तयार करण्यासाठी अहवाल तयार करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख यांच्या दालनात बुधवारी यासंदर्भात बैठक पार पडली. तिला पालिकेचे शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी, आरटीओचे अधिकारी एन. नाईक आदी उपस्थित होते. स्थानिक वाहतूक डेपोतूनच सुरू राहावी आणि बाहेरगावी जाणाऱ्या बससाठी शहराबाहेर खडकपाडा येथे डेपो असल्यास वाहतूककोेंडीचा प्रश्न सुटेल, असा पवार यांचा दावा आहे. त्यांच्या मागणीच्या आधारे राज्यमंत्री देशमुख यांनी एसटी आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांना पोर्ट तयार करण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी) >प्रवाशांना अकारण भुर्दंडकल्याण डेपोतून २५५ बस फेऱ्या होतात. ७० बस डेपोत आहेत. ८० हजार प्रवासी दररोज प्रवास करतात. भिवंडी ग्रामीण, कल्याण ग्रामीणसह बीड, नगर, आळेफाटा, नारायणगाव, मंचर, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, सातारा, सांगली, कराड, सोलापूर आदी भागांत प्रवासी प्रवास करतात. १९७२ पासून डेपो अस्तित्वात आहे. पाच एकर जागा महामंडळाच्या मालकीची आहे. बाहेरगावी जाणाऱ्या बसचा डेपो खडकपाड्याला नेल्यास डेपो पोर्ट होईल. मात्र, प्रवाशांना खडकपाड्याला जाण्यासाठी सध्याच्या भाड्यानुसार किमान ६० रुपये भाडे मोजावे लागेल.