शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Kalyan: महिलांविषयी कुजबुज करणे चळवळीसाठी घातक- आशालता कांबळे

By सचिन सागरे | Updated: May 13, 2023 17:42 IST

Kalyan: चळवळ मजबूत करण्याच्या अडथळ्यात महिलांविषयी करण्यात येणारी कुजबुज हे एक महत्वाचे कारण आहे. अशाप्रकारच्या कुजबुजमुळे चळवळ बॅकफुटला येत असल्याचे मत ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक आशालता कांबळे यांनी येथे व्यक्त केले.

- सचिन सागरेकल्याण -  चळवळ मजबूत करण्याच्या अडथळ्यात महिलांविषयी करण्यात येणारी कुजबुज हे एक महत्वाचे कारण आहे. अशाप्रकारच्या कुजबुजमुळे चळवळ बॅकफुटला येत असल्याचे मत ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक आशालता कांबळे यांनी येथे व्यक्त केले. समता संघर्ष संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त 'संवाद चळवळीचा' हा कार्यक्रम पश्चिमेतील आचार्य अत्रे रंगमंदिर सभागृह येथे शनिवारी पार पडला. चार सत्रात आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेचे उद्घाटन आशालता यांच्या हस्ते पार पडले. या उद्घाटनप्रसंगी उपस्थितांसोबत त्यांनी संवाद साधला.

संविधान संस्कृती रुजविण्यासाठी साहित्य व कलाक्षेत्र योग्य दिशेने विकसित करणे गरजेचे आहे. चळवळ जिवंत ठेवायची असेल तर त्यासाठी लेखन करणारे, बोलणारे आणि कृती करणारे असे सर्वच चळवळीसाठी आवश्यक आहेत. त्याचबरोबर, सखोल अभ्यास करणेही तितकेच महत्वाचे आहे. तरुणांसाठी साहित्य संमेलन होत नसल्याची खंतही यावेळी व्यक्त करीत दर महिन्याला विविध प्रकारची शिबिरे घेऊन कार्यकर्ता घडविण्याचा सल्लाही आशालता यांनी यावेळी दिला.

तरुण कार्यकर्ते घडविणे महत्वाचे असून तरुण कार्यकर्त्याची फळी कशी तयार होईल या दृष्टीने संघटनेने काम करणे महत्वाचे असल्याचे अध्यक्षीय भाषणात फुले - मार्क्स - आंबेडकरवादी ज्येष्ठ कार्यकर्ते गौतम जाधव म्हणाले. स्वागताध्यक्ष सदानंद गायकवाड यांनी समता संघर्ष संघटनेच्या कामाबाबतची माहिती उपस्थितांना दिली. कार्यकर्ता कुठे चाललाय, कुठे हरवलाय यावर आपल्या बीजभाषणात समता संघर्ष संघटनचे अध्यक्ष शैलेश दोंदे यांनी प्रकाशझोत टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री सुरेखा पैठणे यांनी केले.

टॅग्स :kalyanकल्याणWomenमहिला