शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांत गेले ‘कल्याण’! डोंबिवलीतही चालकांची चकवाचकवी : परतीच्या पावसाचा रस्तादुरुस्तीत व्यत्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:56 IST

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे मात्र डागडुजीअभावी रस्त्यांवरील खड्ड्यांची ‘रांगोळी’ शहरांमध्ये पाहायला मिळत आहे.

कल्याण : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे मात्र डागडुजीअभावी रस्त्यांवरील खड्ड्यांची ‘रांगोळी’ शहरांमध्ये पाहायला मिळत आहे. कल्याण आणि डोंबिवलीत जागोजागी पडलेले मोठमोठे खड्डे चुकवताना वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. पाऊस पूर्णपणे थांबल्यावरच रस्ता दुरुस्तीची कामे सुरू करणार असल्याचे केडीएमसीने स्पष्ट केल्याने ‘जा रे जा रे पावसा’ असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.कल्याण-डोंबिवलीत गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दसरा या सणांमध्ये खड्ड्यांची समस्या मोठ्या प्रमाणावर होती. परंतु, सध्याचे वास्तव पाहता दिवाळीतही खड्ड्यांचा त्रास कायम राहण्याची चिन्हे आहेत. शहरातील बहुतांश रस्ते हे खड्डेमय झाले आहेत. काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्यांवरील पेव्हर ब्लॉक खचल्याने त्या रस्त्यांनी प्रवास करणेही जिकिरीचे होऊन बसले आहे. स्थायी समिती असो अथवा महासभेमध्ये वारंवार खड्ड्यांचा मुद्दा चर्चिला गेला आहे. स्थायी समितीचे सभापती रमेश म्हात्रे यांनी, तर रस्त्यांच्या कामात दर्जा राखला जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. गणेश विसर्जनाआधी रस्ते खड्डेमुक्त होतील, असे आश्वासन महापौर राजेंद्र देवळेकर आणि आयुक्त पी. वेलरासू यांनी दिले होते. परंतु, सध्या दिवाळी तोंडावर आला तरी रस्त्यांची परिस्थिती सुधारलेली नाही.नुकत्याच झालेल्या महासभेत शिवसेनेचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी सभा तहकुबीच्या माध्यमातून खड्ड्यांचा विषय सभागृहात उपस्थित केला होता. तसेच विरोधीपक्षनेते मंदार हळबे यांनीही मांडलेल्या तहकुबीच्या आधारे या समस्येकडे लक्ष वेधले होते. त्यावेळी आयुक्तांनी जोपर्यंत पाऊस थांबत नाही, तोपर्यंत कामे सुरू होणार नाहीत, असे स्पष्टीकरण दिले होते. हवामान खात्याशी संपर्क असून त्यांच्याकडून पावसाबाबत माहिती घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, खड्ड्यांची समस्या दिवसागणिक अधिकच गंभीर बनत चालली आहे. त्यात परतीच्या पावसाने उच्छाद मांडल्याने पाण्याने भरलेल्या खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. खड्ड्यांत पडून काहीजण जायबंदी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वेलरासू यांनी रस्त्यांची दुरुस्ती व खड्डे बुजवण्याची कामे सुरू करण्याच्या सूचना केल्याची सूत्रांची माहिती आहे. परंतु, पडणाºया पावसात टाकण्यात येणारे डांबर अल्पावधीत उखडले जात आहेत. यासंदर्भात नगरसेवकांच्या तक्रारी वाढत आहेत. मात्र, सध्याचा परतीचा पाऊस दररोज हजेरी लावत असल्याने रस्त्यांची कामे सुरू करण्यास कोणताही अधिकारी धजावत नसल्याचे पाहावयास मिळत आहे. परिणामी गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाप्रमाणे आता दिवाळीतही खड्ड्यांचा त्रास नागरिकांच्या वाट्याला येण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली