शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

कल्याण-तळोजा मेट्रो मार्गी

By admin | Updated: October 29, 2016 04:06 IST

तळोजा, शीळ, डोंबिवली, कल्याण परिसरातील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सुचवलेल्या तळोजा- डोंबिवली- कल्याण मेट्रो

कल्याण : तळोजा, शीळ, डोंबिवली, कल्याण परिसरातील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सुचवलेल्या तळोजा- डोंबिवली- कल्याण मेट्रो प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल तयार करण्याच्या हालचाली एमएमआरडीएने सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यातच या मार्गाला तत्वत: मंजुरी दिली. शिंदे यांनी शुक्र वारी एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त प्रवीण दराडे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर प्रकल्पाचे सविस्तर सादरीकरण केले. या वेळी कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर, शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, सभागृह नेते राजेश मोरे, गटनेते रमेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. एमएमआरडीए आणि सिडको यांनी अनुक्र मे मुंबई आणि नवी मुंबईत आखलेले मेट्रो प्रकल्प परस्परांना जोडले, तर कल्याण, डोंबिवली, २७ गावे, शीळ फाटा, मुंब्रा, दिवा, कळवा, खारेगाव, उल्हासनगर, अंबरनाथ अशा महानगरांना त्याचा लाभ होईल, असे सादरीकरण शिंदे यांनी केले. त्यांनु सुचवलेल्या मेट्रो जोडणाऱ्या मार्गांत प्रामुख्याने तळोजा-शीळ फाटा-डोंबिवली-कल्याण, पोखरण-माजीवडा-खारेगाव-मुंब्रा-शीळ फाटा, महापे-शीळ फाटा, दिघा-खारेगाव आणि कासारवडवली-दहीसर या मार्गांचा समावेश आहे. शिंदे यांनी सुचवलेल्या या मार्गांचा अभ्यास करण्याचे निर्देश प्रकल्प सल्लागारांना लगेच देण्यात येतील, असे दराडे यांनी सांगितले.एमएमआर परिसरातील लोकसंख्या वाढीचा वेग मुंबईपेक्षाही अधिक आहे. येथील लोकसंख्या सध्या एक कोटीच्या आसपास आहे. २०२१ मध्ये मुंबईपेक्षाही अधिक लोकसंख्या असेल. शिवाय, २७ गावांमधील ग्रोथ सेंटर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, दिल्ली - मुंबई फ्रेट कॉरिडॉर, नैना आदी प्रकल्पांमुळे पनवेल, उरण, तळोजा, २७ गावांच्या परिसराचा प्रचंड विकास होणार आहे. (प्रतिनिधी)प्रवास होणार स्वस्त आणि मस्तकल्याण, डोंबिवली, ठाणे, कळवा, मुंब्रा, शीळ फाटा, अंबरनाथ, उल्हासनगर या परिसरातून चाकरमानी मोठ्या प्रमाणावर नवी मुंबईच्या दिशेने जातील. ही गरज लक्षात घेऊन आतापासूनच मेट्रोचे नियोजन आणि अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असे खा. शिंदे यांनी सांगितले. हे प्रस्तावित मार्ग झाले तर मुंबईसह संपूर्ण एमएमआर रिजनमधील प्रवासी एकाच तिकिटावर कुठूनही कुठेही आरामदायी आणि किफायतशीर प्रवास करू शकतील.