शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
2
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
3
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
4
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
5
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
6
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
7
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
8
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
9
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
11
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
12
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
13
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
14
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
16
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
17
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
18
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
19
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
20
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

कल्याण डोंबिवलीत शिवसेनेला यश मिळालं, पण बहुमत नाही

By admin | Updated: November 3, 2015 11:46 IST

कल्याण डोंबिवली महापालिकेत ६० जागांची मॅजिक फिगर गाठत शिवसेना स्वबळावर सत्ता स्थापू शकेल हे स्पष्ट झाले असून शिवसेना भाजपाला बरोबर घेतं का

ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. २ - कल्याण डोंबिवली महापालिकेत सुरुवातीच्या कलामध्ये बहुमत मिळणार असं दिसत असतानाच शिवसेनेला बहुमताने हुलकावणी दिली असून स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचे मनसुबे पूर्ण होणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेला ५२, भाजपाला ४२, मनसेला ९, काँग्रेसला ४, राष्ट्रवादीला २, एमआयएम व बसपाला प्रत्येकी १ व अपक्षांना ९ जागांवर विजय मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपा व शिवसेनेची युती झाली नाही तर मनसेची भूमिका मुख्य ठरणार आहे. आता भाजपा अथवा शिवसेना मनसेला सोबत घेऊन मॅजिक फिगर गाठते की भाजपा व शिवसेना एकत्र येऊन प्रचंड बहुमताची सत्ता स्थापन करतात हा कळीचा प्रश्न आहे. 
एमआयएमने अनपेक्षीतरित्या यश मिळवले असून एमआयएमने ७ जागा लढवल्या आणि त्यापैकी एका जागेवर विजय मिळवत प्रथमच कल्याण डोंबिवलीत खातं उघडलं आहे. 
कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी रविवारी झालेल्या मतदानात सुमारे ४७ टक्के मतदान झाले होते. केडीएमसीतील १२२ जागांसाठी सुमारे ७५० उमेदवार रिंगणात आहे. १२२ पैकी ३ प्रभागांमधील उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. यात भाजपा, शिवसेना व बसपाच्या उमेदवाराचा समावेश आहे. टिटवाळा येथील प्रभाग क्रमांक १० मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष तरे तर डोंबिवली ग्रामीणमधील २७ गावांमधून शिवसेनेच्या प्रमिला पाटील विजयी झाल्या आहेत. मनसेचे इंजिन पुन्हा एकदा रुळावरुन घसरले आहे. गेल्या वेळी कल्याण डोंबिवलीतून मनसेचे २७ नगरसेवक निव़डून आले होते. मात्र यंदा मनसेला फक्त ६ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. 
शिवसेना - भाजपामधील आरोप प्रत्यारोप, राडेबाजी यामुळे गाजलेल्या कल्याण डोंबिवली महापालिका (केडीएमसी) निवडणुकीसाठी सोमवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. मावळत्या महापौर व शिवसेनेच्या उमेदवार कल्याणी पाटील यांचा पराभव झाल्याने शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे. भाजपाच्या सुमन निकम यांनी पाटील यांचा पराभव केला असून कल्याण डोंबिवलीत शिवसेना - भाजपामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली.
कल्याणमध्ये एमआयएम पक्षानेही चार जागांवर विजय मिळवत खाते उघडले आहे. एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र तरीदेखील एमआयएमने विजय मिळवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
 
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक : २०१५...
 
प्रभागनिहाय विजयी उमेदवार आणि पक्ष पुढीलप्रमाणे -
 
प्रभाग १ उम्बर्डे वाडेघर - जयवंत भोईर (शिवसेना), 
 
प्रभाग २ कोलीवली - वैशाली भोईर (शिवसेना),
 
 प्रभाग ३ गंधारे - शालिनी वायले (शिवसेना), 
 
प्रभाग ४ बारावे - रजनी मिरकुटे (शिवसेना), 
 
प्रभाग ५ गौरीपाडा - दयानंद गायकवाड (भाजप),
 
 प्रभाग ६ वडवली - हर्षाली थवींल (शिवसेना), 
 
प्रभाग ७ आंबिवली - गोरख जाधव (शिवसेना),
 
 प्रभाग ८ मांडा (प.) - अपेक्षा जाधव (मनसे),  
 
प्रभाग ९ मांडा (पु.) - उपेक्षा भोईर (भाजप),
 
 प्रभाग १० टिटवाला - संतोष तरे (राष्ट्रवादी),
 
 प्रभाग ११ बल्याणी - नमिता पाटील (शिवसेना),
 
 प्रभाग १२ गालेगाव - शितल गायकवाड (अपक्ष), 
 
प्रभाग १३ मोहने गावठान - दयाशंकर शेट्टी (शिवसेना),
 
 प्रभाग १४ मोहने कोलीवाडा - सुनंदा कोट(मनसे),
 
 प्रभाग १५ शहाड - गणेश कोट (शिवसेना), 
 
प्रभाग १६ घोलपनगर - राजेंद्र देवलेकर (शिवसेना), 
 
प्रभाग १७ बिर्ला कॉलेज - छाया वाघमारे (शिवसेना), 
 
प्रभाग १८ खडकपाडा - अर्जुन भोईर (भाजप),
 
 प्रभाग १९ वायलेनगर - मनिषा तारे (शिवसेना), 
 
प्रभाग २० आधारवाडी - वरुण पाटील (भाजप), 
 
प्रभाग २१ फडके मैदान - मोहन उगले (शिवसेना),
 
 प्रभाग २२ बेतुरकारपाडा - वैशाली पाटील(भाजप), 
 
प्रभाग २३ फ्लॉवर व्हैली कस्तूरी देसाई - (मनसे),
 
 प्रभाग २४ कोकण वसाहत - निलिमा पाटील (शिवसेना), 
 
प्रभाग २५ रामदासवाडी - प्रियंका भोईर (शिवसेना), 
 
प्रभाग २६ रामबाग - वैजयंती घोलप (शिवसेना), 
 
प्रभाग २७ चिकनघर - तृप्ती भोईर (मनसे),
 
 प्रभाग २८ काळा तलाव - सुधीर बासरे (शिवसेना),
 
 प्रभाग २९ ठानकरपाडा - संदीप गायकर (भाजप), 
 
प्रभाग ३० चिखलेबाग - श्रेयस समेळ (शिवसेना),
 
 प्रभाग ३१ अहिल्याबाई चौक अरुण गीध (अपक्ष), 
 
प्रभाग ३२ पारनाका - कासिफ तानकी(अपक्ष), 
 
प्रभाग ३३ गफूर डॉन चौक - जवाद डोन ( राष्ट्रवादी), 
 
प्रभाग ३४ गोविंदवाडी - तानजिला मोलवी - (एमआयएम), 
 
प्रभाग ३५ रोहिदासवाडा - शकीला दस्तगीर (अपक्ष),
 
 प्रभाग ३६ बैलबाजार - प्रकाश पेणकर (शिवसेना),  
 
प्रभाग ३७ जोशीबाग - सचिन खेमा (भाजप),  
 
प्रभाग ३८ रामबाग - वीना जाधव (शिवसेना),
 
 प्रभाग ३९ अशोकनगर - दशरथ घाडीगावकर (शिवसेना), 
 
प्रभाग ४० शिवाजीनगर - पुरुषोत्तम चव्हाण (शिवसेना),
 
 प्रभाग ४१ कोलसेवाडी - जान्हवी पोटे (कोंग्रेस),
 
 प्रभाग ४२ लोकग्राम - मल्लेश शेट्टी (शिवसेना),  
 
प्रभाग ४३ नेतिवली - नवीन गवळी (शिवसेना), 
 
प्रभाग ४४ नेतिवली टेकडी - गणेश भाणे (भाजप), 
 
प्रभाग ४५ कचोरे - रेखा चौधरी (भाजप), 
 
प्रभाग ४६ खंबाळपाडा - शिवाजी शेलार, बिनविरोध (भाजप), 
 
प्रभाग ४७ चोलेगांव - प्रमिला चौधरी (भाजप),  
 
 प्रभाग ४८ बावनचाळ - रेखा म्हात्रे (शिवसेना)
 
 प्रभाग ४९ राजू नगर - कविता म्हात्रे (भाजप),
 
 प्रभाग ५० गरीबाचा पाडा - विकास म्हात्रे (भाजप),  
 
प्रभाग ५१ महाराष्ट्र नगर - वामन म्हात्रे (शिवसेना), 
 
प्रभाग ५२ देवीचा पाडा - सरोज भोईर (मनसे), 
 
प्रभाग ५३ मोठागाव - जयेश म्हात्रे (शिवसेना), 
 
प्रभाग ५४ ठाकुरवाडी - संगीता पाटील (शिवसेना),  
 
प्रभाग ५५ नवागांव - दीपेश म्हात्रे (शिवसेना),  
 
प्रभाग ५६ गावदेवी - प्रकाश भोईर (मनसे), 
 
प्रभाग ५७ जयहिंद कॉलनी - हर्षदा भोईर (कोंग्रेस), 
 
प्रभाग ५८ प्रसाद सोसायटी - नंदू म्हात्रे (कोंग्रेस),  
 
प्रभाग ५९ कान्होजी जेधे- विद्या म्हात्रे (भाजप),  
 
प्रभाग ६० गणेश मंदिर - मनीषा धात्रक (भाजप), 
 
प्रभाग ६१ विष्णू नगर - शैलेश धात्रक (भाजप),
 
 प्रभाग ६२ शास्त्री नगर - वृषाली पाटील (भाजप),  
 
प्रभाग ६३ कोपर रोड - गुलाब म्हात्रे (शिवसेना),  
 
प्रभाग ६४ जुनी डोंबिवली - विनीता राणे (शिवसेना), 
 
प्रभाग ६५ कोपर रोड - रमेश म्हात्रे (शिवसेना), 
 
प्रभाग ६६ आयरेगाव - मंदार टावरे (भाजप), 
 
प्रभाग ६७ म्हात्रे नगर - मुकुंद पेडणेकर (भाजप), 
 
 प्रभाग ६८ राजाजी पथ  - मंदार हळबे (मनसे), 
 
प्रभाग ६९ शिव मार्केट - विश्वदीप पवार (भाजप), 
 
प्रभाग ७० स्वातंत्तरत्रविर सावरकर रोड - संदीप पुराणिक (भाजप), 
 
प्रभाग ७१ सारस्वत कॉलनी - खुशबू चौधरी (भाजप),
 
 प्रभाग ७२ पेंडसे नगर - राहुल दामले (भाजप), 
 
प्रभाग ७३ इंदीरा नगर - दर्शना शेलार (कोंग्रेस), 
 
प्रभाग ७४ पाथर्लि - नीलेश म्हात्रे (भाजप), 
 
प्रभाग ७५ टिळकनगर - राजन आभाले (भाजप), 
 
प्रभाग ७६ रघुवीरनगर - राजेश मोरे (शिवसेना), 
 
प्रभाग ७७ दत्त नगर - भारती मोरे (शिवसेना),   
 
प्रभाग ७८ तुकाराम नगर- नितीन पाटील (भाजप),
 
 प्रभाग ७९ सुनील नगर - अलका म्हात्रे (भाजप),
 
 प्रभाग ८० एकता नगर - ज्योती मराठे (मनसे), 
 
प्रभाग ८१ आनंद नगर - दीपाली पाटील (शिवसेना), 
 
 प्रभाग ८२ अंबिकानगर - महेश पाटील (भाजप), 
 
प्रभाग ८३ गोग्रासवाडी - सायली विचारे (भाजप),  
 
प्रभाग ८४ आजदे - विनोद काळन (भाजप),
 
 प्रभाग ८५ डोंबिवली एमआयडीसी - पूजा म्हात्रे (शिवसेना), 
 
प्रभाग ८६ गोलवली - सुनीता खंडागले (भाजप), 
 
प्रभाग ८७ शास्त्री नगर - राजवंती मढवी (शिवसेना),
 
 प्रभाग ८८ संतोष नगर - महेश गायकवाड (शिवसेना), 
 
प्रभाग ८९ मंगल राघो नगर - सुशीला माळी (शिवसेना),
 
 प्रभाग ९० चिकनी पाडा नगर - संगीता गायकवाड (शिवसेना)
 
  प्रभाग ९१ जरिमरी नगर - नीलेश शिंदे (शिवसेना), 
 
प्रभाग ९२ गणेशवाडी - सुमन निकम (भाजप),  
 
प्रभाग ९३ लक्ष्मी बाग - विशाल पावशे (भाजप), 
 
प्रभाग ९४ आनंदवाडी - स्नेहल पिंगले (शिवसेना), 
 
प्रभाग ९५ नेहरू नगर - विक्रम तरे (भाजप), 
 
प्रभाग ९६ जाईबाई नगर - रमेश जाधव (शिवसेना), 
 
प्रभाग ९७ शनी नगर - राजाराम पावशे (शिवसेना), 
 
प्रभाग ९८ विजय नगर- शितल मंढारी (शिवसेना),  
 
प्रभाग ९९ अमराई - माधुरी काळे (शिवसेना), 
 
प्रभाग १०० तिसगाव - देवानंद गायकवाड (शिवसेना), 
 
प्रभाग १०१ हनुमान नगर - हेमलता पावशे (भाजप), 
 
प्रभाग १०२ भगवान नगर - सारीका जाधव (शिवसेना),  
 
प्रभाग १०३ कैलास नगर - मनोज राय (भाजप),  
 
प्रभाग १०४ खडेगोलवली - मोनाली तरे (भाजप),
 
 प्रभाग १०५ आशेले - सोनी अहिरे बिनविरोध (बसपा)
 
 प्रभाग १०६ चिंचपाडा - उर्मिला गोसावी (शिवसेना), 
 
प्रभाग १०७ पिसवली - मोरेश्वर भोईर (भाजप), 
 
प्रभाग १०८ अडीवली - कुणाल पाटील (अपक्ष)
 
 प्रभाग १०९ गोळवली - रमाकांत पाटील (भाजप), 
 
प्रभाग ११० सोनारपाडा - प्रमिला पाटील (शिवसेना)
 
प्रभाग १११ सागाव - सुनीता पाटील (भाजप), 
 
प्रभाग ११२ नान्दीवली - रूपाली म्हात्रे (अपक्ष), 
 
प्रभाग ११३ पी एण्ड टी - प्रेमा म्हात्रे बिनविरोध (शिवसेना),
 
 प्रभाग ११४ भोपर - बहिष्कार
 
प्रभाग ११५ नान्दीवली मीनल पार्क - आशालता बाबर (शिवसेना),  
 
प्रभाग ११६ मानगाव सोनार पाडा - दमयंती वजे (अपक्ष) 
 
प्रभाग ११७ उम्ब्रोली - जालिंदर पाटील (भाजप), 
 
प्रभाग ११८ आशेले गांव - इंदिरा तरे (भाजप),  
 
प्रभाग ११९ मानेरे - बहिष्कार,
 
प्रभाग १२० हेदुटने - शैलजा भोईर (अपक्ष), 
 
प्रभाग १२१ घारिवली काटइ - पूजा पाटील (मनसे),