शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

कल्याण-डोंबिवली महापौर निवड होणार बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 06:55 IST

  कल्याण-डोंबिवलीच्या महापौर-उपमहापौरपदाची बुधवारी पार पडणारी निवडणूक बिनविरोध होईल, असा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. भाजपाने मात्र कोणतीही भूमिका जाहीर न करता ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’चा पवित्रा घेतला आहे. त्यातच महापौर आणि उपमहापौरपदासाठी प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणाऱ्या भाजपाच्या नगरसेविका उपेक्षा भोईर आणि शिवसेनेचे सहयोगी अपक्ष नगरसेवक कासिफ तानकी हेही त्याच दिवशी माघार घेण्याची चिन्हे असल्याने त्या दिवशी नेमक्या कोणकोणत्या घडामोडी घडतात, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

- प्रशांत मानेकल्याण -  कल्याण-डोंबिवलीच्या महापौर-उपमहापौरपदाची बुधवारी पार पडणारी निवडणूक बिनविरोध होईल, असा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. भाजपाने मात्र कोणतीही भूमिका जाहीर न करता ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’चा पवित्रा घेतला आहे. त्यातच महापौर आणि उपमहापौरपदासाठी प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणाऱ्या भाजपाच्या नगरसेविका उपेक्षा भोईर आणि शिवसेनेचे सहयोगी अपक्ष नगरसेवक कासिफ तानकी हेही त्याच दिवशी माघार घेण्याची चिन्हे असल्याने त्या दिवशी नेमक्या कोणकोणत्या घडामोडी घडतात, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.उल्हासनगरच्या सत्तांतराच्या राजकारणात भाजपा कल्याणमधील महापौरपदाचा दावा सोडेल, असे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. त्याप्रमाणे महापौरपदासाठी शिवसेनेकडून विनीता राणे आणि उपमहापौरपदासाठी भाजपाच्या उपेक्षा भोईर यांनी एकत्रित आपापले उमेदवारी अर्ज महापालिका सचिव संजय जाधव यांना सादर केले होते. परंतु शिवसेनेचे सहयोगी अपक्ष नगरसेवक कासिफ तानकी यांनी उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्याने उपमहापौरपदासाठी भाजपाकडून अर्ज भरणाºया भोईर यांनी महापौरपदासाठीही अर्ज भरला. प्रारंभी उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना-भाजपामध्ये युतीचे चित्र दिसून आले. पण तानकी यांच्या अर्जामुळे ही शिवसेनेचीच नवी खेळी असल्याचा भाजपा नेत्यांचा समज झाला. त्यामुळेच महापौरपदासाठी अर्ज दाखल करणाºया उपेक्षा भोईर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करणारे कासिफ तानकी हे दोघेही आपला अर्ज मागे घेतील आणि निवडणूक बिनविरोध होईल, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे गटनेते रमेश जाधव दिले. उमेदवारी मागे घेण्याच्या अर्जावर भोईर आणि तानकी यांच्या स्वाक्षºया घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.भाजपाचे गटनेते वरूण पाटील यांनी शिवसेनेच्या दोन्ही अर्जांवर सावध पवित्रा घेत बुधवारी निवडणुकीच्या वेळीच काय तो निर्णय होईल, असे मोघम सांगत पक्षाची भूमिका स्पष्ट केलेली नाही.‘आमदारकीसाठीविचार करा’महापौरपदासाठी शिवसेनेच्या इच्छुक नगरसेविकात वैशाली भोईर यांचाही समावेश होता. परंतु त्यांचा विचार न झाल्यामुळे नगरसेवक असलेले त्यांचे दीर जयवंत भोईर नाराज आहेत. पक्षाच्या आदेशापुढे आम्ही काहीही बोलू शकत नाही. परंतु आगामी स्थायी समिती सभापती आणि आमदारकीच्या निवडणुकीसाठी आमचा विचार होणे आवश्यक आहे. अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा भोईर यांनी दिला.कोण आहेत राणे, भोईर आणि तानकी?महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या शिवसेना नगरसेविका विनीता राणे यांची नगरसेवकपदाची ही पहिलीच टर्म आहे. राणे यांचे शिक्षण डिप्लोमा इन जनरल नर्सिंग असे आहे. मुंबई महापालिकेच्या नायर रूग्णालयात सिस्टर इन्चार्ज म्हणून त्यांनी ३२ वर्षे सेवा बजावली आहे. स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या राणे यांनी २०१५ ला पहिल्यांदा महापालिकेची निवडणूक लढविली आणि त्या डोंबिवली पश्चिमेकडील जुनी डोंबिवली प्रभागातून शिवसेनेच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या. त्यांचे पती विश्वनाथ राणे हे २००० पासून नगरसेवक म्हणून महापालिकेत आहेत. त्यांनी गटनेता, विरोधी पक्षनेता ही पदेही भूषविली आहेत.उपमहापौरसह महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाºया भाजपाच्या उपेक्षा भोईर यांची केडीएमसीतील नगरसेवकपदाची दुसरी टर्म आहे. २०१५ ला त्या मांडा पूर्व या प्रभागातून निवडून आल्या आहेत. सभागृहातील अभ्यासू आणि सडेतोड व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणारे शिवसेनेचे सहयोगी अपक्ष नगरसेवक कासिफ तानकी यांचीही ही नगरसेवकपदाची पहिलीच टर्म आहे. सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख असलेले तानकी हे कल्याण पश्चिमेतील सिध्देश्वर आळी या प्रभागातून अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. निवडून आल्यावर त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.‘बुधवारीच चित्रस्पष्ट होईल’महापौरपदासाठी उमेदवारी दाखल करणाºया भाजपाच्या नगरसेविका उपेक्षा भोईर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही बुधवारीच महापौरपदासाठी दाखल केलेला अर्ज मागे घ्यायचा की जैसे थे ठेवून निवडणूक लढवायची याचा निर्णय होईल, असे सांगितले. पक्षाचे वरिष्ठ जो आदेश देतील, त्याप्रमाणे कृती होईल असे भोईर म्हणाल्या. तर उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणारे कासिफ तानकी यांनीही माघारीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही आणि मी उमेदवारी मागे घेण्याच्या कोणत्याही अर्जावर स्वाक्षरी केलेली नाही. बुधवारीच काय ते समोर येईल, असे ते म्हणाले.कोअर कमिटीचा दावा फोल : कोअर कमिटीच्या बैठकीनंतर आगामी महापौर भाजपाचाच असेल, असे परिपत्रक त्या पक्षाने जारी केले होते . पण हा दावा फोल ठरला आहे. उल्हासनगरच्या राजकारणातून भाजपाने ऐनवेळी शिवसेनेपुढे नमते घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. राजकीय स्वार्थापोटी पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेनेपुढे नांगी टाकल्याचा आरोप त्यांच्याकडून होत आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाnewsबातम्या