शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Kalyan: भाऊ बहिणीने केले शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे,पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By मुरलीधर भवार | Updated: August 29, 2023 17:51 IST

Kalyan: कल्याण पूर्वेत एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. भाऊ बहिणीने परिसरात राहणाऱ्या बारा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केले आहेत. भाऊ अश्लील चाळे करत असताना बहिणीने मोबाईलवर व्हिडिओ काढला आहे.

- मुरलीधर भवार कल्याण - कल्याण पूर्वेत एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. भाऊ बहिणीने परिसरात राहणाऱ्या बारा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केले आहेत. भाऊ अश्लील चाळे करत असताना बहिणीने मोबाईलवर व्हिडिओ काढला आहे.  पीडित मुलीने ही बाब घरी सांगताच तिच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.. कोळशेवाडी पोलीसांनी दोन्ही भाऊ-बहिणी विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना बेडया ठोकल्या आहेत.

बारा वर्षीय पीडित अल्पवयीन मुलगी कुटुंबासह कल्याण पूर्व परिसरात राहते.. याच परिसरात अजय थापा व सपना थापा दोघे भाऊ बहीण राहतात. ही अल्पवयीन मुलगी घराच्या परिसरात खेळत असताना या दोघाची नजर तिच्यावर पडली. अजयने या मुली सोबत अश्लील चाळे केले. अजयचे अश्लील चाळे सुरू असताना त्याची बहीण सपना हिने त्याचा व्हीडीआे तयार केला.  या प्रकारामुळे घाबरलेल्या पीडीतेने तिच्यासोबत घडला प्रकार घरी कुटुंबीयांना सांगितला. पीडितेच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. कोळशेवाडी पोलिसांनी अजय थापा आणि सपना थापा या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

टॅग्स :kalyanकल्याण