शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कळवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्ताने दिली अतिक्रमण आयुक्तांना जीवे मारण्याची धमकी

By अजित मांडके | Updated: July 23, 2022 13:29 IST

नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, अनधिकृत बांधकामांवरील कारवाईत वाढ करणार 

ठाणे :  अतिक्रमण निष्कासन विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त समीर जाधव यांनी ठार मारण्याची तसेच कुटुंबातील सदस्यांना उद्वस्त करण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात  आला आहे, अशी माहिती महेश आहेर यांनीच पत्रकार परिषदेत दिली. 

गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. महेश आहेर हे या कारवाया करण्यात आघाडीवर आहेत. कळवा येथील काही नागरिकांनी महेश आहेर यांच्याकडे गुगल मॅपिंगसह तक्रारी  केल्या होत्या. त्या अनुषंगाने महेश आहेर यांनी समीर जाधव यांना दूरध्वनीवर संपर्क साधून कळवा येथे कारवाई करण्यासाठी पथकासह येत असल्याचे सांगितले. त्यावर समीर जाधव यांनी, तुझे हातपाय तोडून ठार मारेल; तुझ्या कुटुंबालाही संपवून टाकेन, अशी धमकी दिली. या संदर्भात महेश आहेर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आज नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान,  आपण गेल्या अनेक दिवसांपासून बेकायदा बांधकामावर कारवाई करीत आहोत. इतर अधिकारी सहकार्य करीत असताना समीर जाधव यांनी आपणास धमकी दिली आहे. त्यामुळे आपण गुन्हा दाखल केला आहे, असे सांगून महेश आहेर म्हणाले की, या धमकीच्या संदर्भात आपण नगरविकास खात्याकडे अहवाल पाठवणार आहोत. तसेच बेकायदा बांधकामांवरील कारवाईचा वेग अधिक तीव्र करणार असून मुख्यालयातूनच नवीन विशेष पथक स्थापन करून अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करणार आहोत, असेही स्पष्ट केले.