शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

कळवा, मुंब्य्राचे अर्थकारण : निधीच्या मोहाने तलवार म्यान ,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 06:56 IST

अर्थसंकल्पाच्या विशेष महासभेच्या मुद्द्यावरुन राष्टÑवादीने अचानक घूमजाव केले आहे. आधी सभेच्या कायदेशीरपणाला आव्हान देणाऱ्या लोकशाही आघाडीने ही सभा कायदेशीर असल्याचे मत मांडत तिला उपस्थित राहणार असल्याचे सूतोवाच केले. कळवा, मुंब्य््राासाठी पालिका आयुक्तांनी ७०० कोटींची कामे प्रस्तावित केली आहेत.

ठाणे - अर्थसंकल्पाच्या विशेष महासभेच्या मुद्द्यावरुन राष्टÑवादीने अचानक घूमजाव केले आहे. आधी सभेच्या कायदेशीरपणाला आव्हान देणाऱ्या लोकशाही आघाडीने ही सभा कायदेशीर असल्याचे मत मांडत तिला उपस्थित राहणार असल्याचे सूतोवाच केले. कळवा, मुंब्य््राासाठी पालिका आयुक्तांनी ७०० कोटींची कामे प्रस्तावित केली आहेत. महासभेला गैरहजर राहिल्यास प्रभाग सुधारणा निधी देणार नसल्याचा मुद्दा मांडत महापौरांनी तो निधी इतर ठिकाणी वर्ग करण्याचा इशारा दिल्यानेच या तलवारी म्यान झाल्याचे मानले जाते. ही महासभा सोमवारी पार पडेल.ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी १९ मार्चला महासभेत अर्थसंकल्प सादर केला. त्यांचे भाषण झाल्यावर नियमानुसार यावर चर्चा होणे अपेक्षित होते. परंतु राष्टÑगीत म्हणण्यात आल्याने ही महासभा पुन्हा लावता येणे शक्य नसल्याचे मत मांडत लोकशाही आघाडीने चर्चा न करताच अर्थ संकल्प मंजूर झाल्याचा गाजावाजा केला होता. नियमानुसार ती महासभा संपल्याचा अर्थ त्यांनी काढला होता. राष्टÑवादी आणि काँगे्रसने ही महासभा लावली जाऊ नये यासाठी पालिका आयुक्तांकडे पत्रव्यवहारही केला होता. त्यानंतरही चुकीच्या पध्दतीने ही सभा लावली गेली, तर तिला गैरहजर राहण्याचा इशाराही दिला होता. विरोधकांच्या या खेळीला उत्तर देताना महापौर मीनाक्षी शिंदे यांनी जे या सभेला गैरहजर राहतील त्यांना प्रभाग सुधारणा निधी दिला जाणार नसल्याचा इशारा देत त्यांच्या कोंडीचा स्पष्ट इशारा दिला होता. तसेच त्याच्या भागातील निधी हा इतर ठिकाणी वर्ग केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यांची ही मात्रा लागू पडली.अर्थसंकल्पात प्रशासनाने शहर विकासाचा विचार करून कळवा, मुंब्य्रावर खास मेहरनेजर केल्याचे दिसून आले. रिमॉडेलिंग आणि भुयारी गटार योजना, मलनिसारण वाहिन्या टाकण्याची महत्वाची योजना आदींसाठी पालिका स्वत: निधी उपलब्ध करुन देणार आहे. तसेच इतर महत्वाच्या योजनाही येत्याकाळात या भागात नव्याने होऊ घातल्या आहेत. त्यासाठी सुमारे ७०० कोटींच्या निधीची तरतूद आहे.निवडणुकांचा काळ आला तर निधीवर पाणी सोडण्याची भीतीकाही महिन्यांत लोकसभा-विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजतील. आचारसंहिता लागेल. कोणतीही कामे होणार नाहीत. महासभेला गैरहजर राहिलो तर सर्वच योजनांवर पाणी सोडावे लागण्याची भीती होती. शिवाय एवढा मोठा निधी आला तर त्यात सर्वांचेच भले आहे, या अर्थकारणाचा विचार करत लोकशाही आघाडीने तलवार म्यान करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पुढे येत आहे.त्यामुळे सुरूवातीला अर्थसंकल्पावरील चर्चेची महासभा बेकायदा असल्याचा आरोप करणाºया लोकशाही आघाडीला आता मात्र ती कायदेशीर असल्याचा साक्षात्कार झाला आहे. त्यामुळे या महासभेवरील बहिष्काराचे विघ्न दूर झाले असून सोमवारी लोकशाही आघाडीची मंडळी सभेला हजर राहून चर्चेत भाग घेतील आणि योजना, निधी पदरात पाडून घेतील.

टॅग्स :thaneठाणे