शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कळवा-ऐरोली एलिव्हेटेड मार्गाचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 02:25 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन वर्षांपूर्वी भूमिपुजन झालेल्या कळवा-ऐरोली या महत्त्वाकांक्षी एलिव्हेटेड नवीन रेल्वेमार्गाचे काम अद्याप मार्गी लागले नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन वर्षांपूर्वी भूमिपुजन झालेल्या कळवा-ऐरोली या महत्त्वाकांक्षी एलिव्हेटेड नवीन रेल्वेमार्गाचे काम अद्याप मार्गी लागले नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्यामुळे ठाणे रेल्वेस्थानकातील प्रवाशांचा भार दिवसेंदिवस वाढतच आहे.कळवा-ऐरोली या महत्त्वाकांक्षी एलिव्हेटेड नवीन रेल्वेमार्गाचा ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी पाठपुरावा केला. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी २०१५ च्या रेल्वे बजेटमध्ये या प्रकल्पासाठी ४२८ कोटी रूपये मंजूर केले होते. त्यानुसार या प्रकल्पाचे भूमिपूजन डिसेंबर २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र दोन वर्षे उलटूनही या प्रकल्पाचे काम मार्गी लागलेले नाही. या प्रकल्पासाठी मंजूर झालेला निधी परत जाऊ नये, यासाठी त्यांनी या प्रकल्पाचे काम दोन टप्प्यांत करून पहिल्या टप्प्यात दिघा स्टेशनचे काम सुरू करून घेतले. दुसऱ्या टप्प्यात बाधित होणाºया झोपड्यांचे पुनर्वसन एमएमआरडीए खात्याकडून न झाल्याने प्रकल्पाचे काम रखडले आहे. यासंदर्भात विचारे यांनी मुख्यमंत्र्यांची वारंवार भेट घेऊन पत्रव्यवहार केला आहे. मात्र पुनर्वसनाचे आदेश एमएमआरडीएला मिळाले नसल्याने हे काम रखडले आहे. राज्य शासनास हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्र शासनाने आदेश द्यावे, अशी मागणी विचारे यांनी संसदेमध्ये केली होती.>दिघा रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी ५५ कोटीया प्रकल्पात कल्याण डोंबिवली, ठाणे आणि नवी मुंबई शहराच्या विकासात महत्त्वाचा वाटा असलेल्या कळवा-ऐरोली उन्नतमार्गासह दिघा रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. दिघा स्थानक उभारणीसाठीही रेल विकास महामंडळाने हालचाली सुरू केल्या आहेत. या स्थानकाच्या उभारणीसाठी रेल्वे पहिल्या टप्प्यात ५५ कोटी रु पये खर्च करणार आहे. सध्या ठाण्यानंतर ऐरोली हे स्थानक आहे. या दोन्ही स्थानकांतील अंतर ५.७६ किमी आहे. रेतीबंदरनजीकचा उन्नतमार्ग आणिदिघा रेल्वेस्थानक हे दोन्ही प्रकल्प कळवा-ऐरोली या ४२८ कोटींच्या उन्नतमार्गाचाच भाग आहे. दिघा रेल्वेस्थानक येत्या तीन वर्षात उभे करण्याचा रेल्वेचा मानस आहे. त्यासाठी जागतिक बँकेकडे रेल्वे विकास महामंडळाने कर्जही मागितले आहे. पंतप्रधानानी दोन वर्षांपूर्वी या मार्गाचे भूमिपूजन करूनही या मार्गातील जमीन संपादन, झोपड्यांचे पुनर्वसन रखडले आहे. एमएमआरडीएची जबाबादारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे. मात्र, तरीही मोदींनी भूमिपूजन केलेला प्रकल्प दोन वर्षे रखडलेला असल्याने कल्याण-नवी मुंबई मार्गावर प्रवास करणाºया प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा उन्नत मार्ग झाल्यास ठाणे स्थानकावरीलताण कमी होणार आहे.