ठाणे : पाऊस सुरू झाला आणि शहराच्या विविध भागांत पुन्हा रस्त्यांवरील खड््ड्यांनी डोके वर काढले आहे. घाईगडबडीत खुल्या केलेल्या कापूरबावडी येथील उड्डाणपुलावर दोन्ही बाजूंना सुमारे ११० हून अधिक छोटेमोठे खड्डे पडले असून रस्त्यावरील खडीही निघू लागली आहे. त्यामुळे उड्डाणपुलाच्या कामाबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे घोडबंदरचा सर्व्हिस रोडही आता वाहतुकीसाठी खुला केला असला तरीदेखील त्यावरही ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे. याशिवाय, शहरातील इतर ठिकाणच्या रस्त्यांवरदेखील खड्डे पडल्याचे चित्र आहे.रस्त्यांवर खड्डे पडू नयेत, म्हणून ठाणे महापालिकेने विविध स्वरूपांच्या अत्याधुनिक उपाययोजना मागील काही वर्षांपासून हाती घेतल्या आहेत. यामध्ये यूटीडब्ल्यूटी, काँक्रिटीकरण, रेडीमिक्स आदींसह विविध स्वरूपांचे उपाय करूनही शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहे. मागील दीड ते दोन वर्षे रखडलेला घोडबंदरचा सर्व्हिस रोड पावसाच्या काही दिवस आधीच वाहतुकीसाठी संपूर्णपणे खुला करण्यात आला. आता पावसाने या रस्त्यालाही चांगलेच झोपडले आहे. माजिवडा, कापूरबावडी येथील वाहतूककोंडी फुटावी, म्हणून घाईगडबडीत खुल्या केलेल्या कापूरबावडी आणि मुंबईकडे जाणाऱ्या दोन लेनवरही सध्या खड््ड्यांचा पाऊसच पडलेला आहे. टेंभीनाका, कॅसल मिल, माजिवडा आदींसह शहराच्या इतर ठिकाणीदेखील रस्त्यावर आता खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. उड्डाणपुलावर पडलेल्या खड््ड्यांसंदर्भात एमएसआरडीसीला पत्रव्यवहार करण्यात आला असून घोडबंदर मार्गावरील सर्व्हिस रोडला पडलेले खड्डे बुजवले जातील.- सुनील चव्हाण, प्रभारी, आयुक्त, ठामपा
कापूरबावडी पुलाची चाळण
By admin | Updated: July 5, 2016 02:26 IST