शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पावसातही काकोळे गाव पाण्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:13 IST

रेल्वेच्या अखत्यारित असलेल्या जीआयपी धरणाच्या काठावर वसलेल्या काकोळे गावातील ग्रामस्थांवर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे.

अंबरनाथ : रेल्वेच्या अखत्यारित असलेल्या जीआयपी धरणाच्या काठावर वसलेल्या काकोळे गावातील ग्रामस्थांवर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. या धरणातील पाण्याचा वापर रेल्वेच्या मिनरल वॉटर प्रकल्पासाठी करण्यात येतो. मात्र या धरणाच्या काठावरील गावाला मात्र पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. या गावात पाणीपुरवठा योजना राबवण्यात आली आहे. मात्र राबवलेल्या योजनेतील जलवाहिनीतून पाणीच येत नाही अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.काकोळे गाव हे अंबरनाथ नगरपालिका हद्दीला आणि एमआयडीसीला लागून आहे. मात्र हे गाव जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असल्याने या गावाला पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी ही जिल्हा परिषदेवर आहे. या गावात पाण्याची योजना मंजूर झाली. योजनेचे कामही झाले. काम पूर्ण झाल्यावर योजनेचा शुभारंभही झाला. शुभारंभाचे फोटो दाखवत योजनेचे बिलही लाटण्यात आले. मात्र एवढे सगळे झाल्यावरही या योजनेतून काकोळे गावाला पाण्यापासून वंचित रहावे लागले आहे.या गावाची लोकसंख्या ही एक हजाराहून अधिक आहे. तब्बल १५० हून अधिक कुटुंब या गावात राहतात. मात्र पाण्यासाठी त्यांच्यावर भटकंती करण्याची वेळ आली आहे. महिलांना तीन ते चार किलोमीटर अंतरावरील एमआयडीसीमधील कंपन्यांमधून पाणी भरण्याची वेळ आली आहे. तर काही महिला जीआयपी धरणात जाऊन पाणी भरतात. ज्यांना हे अंतर कापणे देखील शक्य होत नाही त्यांना गावाजवळ असलेल्या डबक्यातील कपारीतून निघणाºया पाण्याने तहान भागवण्याची वेळ आली आहे. सर्वत्र जलवाहिनी टाकून ठेवल्या आहेत. मात्र त्या जलवाहिनीसाठी पाणी आणायचे कुठून हा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.