शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीच्या शाळा राहिल्या बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:55 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी केडीएमसीच्या ४०० कर्मचाºयांबरोबर महापालिकेचे शिक्षकही शुक्रवारी रवाना झाले.

कल्याण : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी केडीएमसीच्या ४०० कर्मचाºयांबरोबर महापालिकेचे शिक्षकही शुक्रवारी रवाना झाले. त्यामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या. निवडणुकीच्या कामांसाठी शिक्षक आणखी दोन दिवस जाणार असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.भिवंडीपाठोपाठ मीरा-भार्इंदर महापालिकेच्या निवडणुकीच्या कामासाठीही केडीएमसीचे कर्मचारी मागवण्यात आले आहेत. तब्बल ४०० हून अधिक कर्मचारी मागवल्याने महापालिकेचा कारभार पुन्हा थंडावणार आहे. कर्मचारी पाठवण्यास विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी विरोध दर्शवला आहे.दुसरीकडे मीरा-भार्इंदर महापालिकेच्या निवडणुकांच्या कामांचे प्रशिक्षण सुरू झाल्याने शुक्रवारी केडीएमसीचे कर्मचारी रवाना झाले होते. त्यामुळे महापालिकेच्या मुख्यालयात कर्मचाºयांविना शुकशुकाट होता.महापालिका शाळांमधील शिक्षकही प्रशिक्षणासाठी गेल्याने शाळा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या. विद्यार्थ्यांचा एक दिवसाचा खाडा झाला असताना आता २० आॅगस्टला मतदान होणार असल्याने त्या कालावधीत दोन दिवस शिक्षकांना कामानिमित्त मीरा-भार्इंदरला जावे लागणार आहे. त्यामुळे आणखी दोन दिवस विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. याबाबत पालकांमध्ये नाराजी आहे.सातवी इयत्तेचा अभ्यासक्रम पूर्णपणे बदलला आहे. त्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी केडीएमसी पालिका शाळांतर्फे शुक्रवारी खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित आणि केडीएमसी शाळांसाठी कल्याणमधील टिळक चौकातील पालिकेच्या शंकरराव झुंजारराव शाळेत शिबिर घेण्यात येणार होते. परंतु, पालिकेचे शिक्षक निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी गेल्याने ते या शिबिराला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्यासाठी २ आॅगस्टला शिबिर होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या सहायक कार्यक्रम अधिकारी अर्चना जाधव यांनी दिली.