शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी म्हणाले, श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस आली; आता संजय शिरसाटांचा यू-टर्न; म्हणाले...
2
“कुठूनही पैसे आणा, पण शेतकरी कर्जमुक्ती करा, सातबारा कोरा करा”; मनसेचा बच्चू कडूंना पाठिंबा
3
“ठाकरे बाहेरचे आहेत, महाराष्ट्राने स्वीकारले अन् आता ते...”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
Video: 'महाराष्ट्रातून कोण आलंय? इकडे ये...', नाशिकच्या तरुणासोबत हरयाणात काय घडले? पाहा...
5
Video - हृदयद्रावक! लेक्चरमध्ये विपरित घडलं, शिक्षकाला मृत्यूने गाठलं अन्...; 'मृत्यू' कॅमेऱ्यात कैद
6
रुग्णालयात सुरू होती शस्त्रक्रिया तेवढ्यात फॉल्स सिलिंग तुटून ऑपरेशन थिएटरमध्ये पडला कुत्रा, त्यानंतर...  
7
नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकांकडून वरुण सरदेसाईंना धक्का; उपसभापती म्हणाल्या,'माझ्यावर का खेकसताय?'
8
TCS ची दिवाळी! अपेक्षांना मागे टाकत कमावला १२,७६० कोटींचा नफा, शेअरधारकांना किती लाभांश मिळणार?
9
महाकाय किंग कोब्रा सापाची महिला वन अधिकाऱ्याने केली सुटका, सचिन तेंडुलकरने केलं कौतुक
10
98%ने घसरून थेट 96 पैशांवर आला होता हा ज्वेलरी शेअर, आता 1800% ने वधारला; करतोय मालामाल!
11
"नितीश कुमार नाम सुनके फ्लावर समझे क्या; फ्लावर नहीं फायर है..." दोन्ही सलामीवीरांना धाडलं तंबूत
12
‘दिवसातून ३ तासच वीज येते, काही तरी करा’, उत्तरदाखल ऊर्जामंत्री जय श्रीराम म्हणाले आणि निघून गेले   
13
सावधान! स्क्रीन टाईम नाही तर पालकांकडून नकळत होणाऱ्या 'या' चुकांचा मुलांवर वाईट परिणाम
14
खळबळजनक! लेकीने आई आणि बॉयफ्रेंडच्या मदतीने केली वडिलांची हत्या, नंतर पाहिला चित्रपट
15
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
16
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचं पुन्हा 'ठाकरे सैनिकां'ना आव्हान, म्हणाले, "हिंमत असेल तर…’’
17
LIC, टीसीएसला धक्का, पण इंडसइंड बँक तेजीत! निफ्टी-सेन्सेक्सची घसरण सुरुच, तुमचा पोर्टफोलिओ वाचला का?
18
मराठी-हिंदी वादात शिल्पा शेट्टीची उडी, म्हणाली- "मी महाराष्ट्राची मुलगी, पण..."
19
अ‍ॅडवॉन्स सेफ्टी फीचर्स आणि लेटेस्ट टेक्नोलॉजी; प्रीमियम कारच्या खरेदीवर ३ लाखांची सूट!
20
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांची न्यूझीलंड सफर! '#BeyondTheFilter' अनुभवासाठी भारतीयांनाही आमंत्रण

कुडूस आठवडा बाजारावर मंदीचे सावट

By admin | Updated: February 8, 2016 02:26 IST

कुडूस हे वाडा तालुक्यातील महत्त्वाचे ठिकाण असून औद्योगिक करणाचे मुख्य केंद्र आहे. येथे दर शुक्रवारी आठवडा बाजार भरतो.

वसंत भोईर,  वाडाकुडूस हे वाडा तालुक्यातील महत्त्वाचे ठिकाण असून औद्योगिक करणाचे मुख्य केंद्र आहे. येथे दर शुक्रवारी आठवडा बाजार भरतो. त्यात ग्राहकांची गर्दी उसळते. मात्र आता या बाजारावर मंदीचे सावट पसरले असल्याने बाजारातील खरेदी निम्म्याने घटली असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. लाखो रुपयांची उलाढाल होणाऱ्या या बाजारातील खरेदी निम्म्याने घटल्याने व्यापारी हवालदिल झाले आहेत. कुडूस ही ५२ गावाची बाजारपेठ असून या गावाची लोकसंख्या सुमारे ३० ते ३५ हजारांच्या आसपास आहे. तसेच या परिसरात शेकडो कारखाने असल्याने हजारो कामगार येथे वास्तव्यास आले आहेत. यामध्ये परप्रांतीय कामगारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे स्थानिक व परप्रांतीय नागरिकांची गदीॅ आठवडा बाजारात मोठ्या प्रमाणात असते. पूर्वी अर्धा दिवस हा बाजार चालायचा पण आता मात्र तो पूर्ण दिवस असतो. या बाजारात भाजीपाला, कांदे बटाटे, मसाल्याचे पदार्थ, विविध प्रकारची भांडी, ओली मच्छी, सुकी मच्छी, कपडे, किराणा सामान, चपला व बूट, कडधान्ये, मिठाईची दुकाने, गावठी पालेभाज्या, खाद्यतेल, मसाला व हळदीची दुकाने असतात. या बाजारात सुमारे ६०० छोटे मोठे व्यापारी आपल्या मालाची विक्री करण्यासाठी येतात. पूर्वी या बाजारात प्रचंड गर्दी असायची पूर्ण दिवस बाजारात गर्दी असायची मात्र गेल्या सहा महिने वषार्पासून मंदीचे सावट असल्याने व येथील अनेक कारखाने बंद पडले असल्याने या बाजारात खरेदीचे प्रमाण निम्म्याने घटले असल्याची माहिती येथील व्यापारी सागर गुप्ता या व्यापा-याने दिली. पूर्वी आम्ही चार वाजताच आमचा माल संपवून घरी परतायचो पण आता कमी ग्राहक बाजारात येत असल्याने निम्म्याने विक्रीचे प्रमाण घटले आहे. वाड्यातील अनेक कारखाने बंद पडत आहेत. लोखंडाचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांना विजेच्या वाढत्या दरामुळे उत्पादन करणे परवडत नसल्याने सुमारे ३० टक्के कारखाने बंद पडले आहेत. या कारखान्यात काम करणारा परप्रांतीय कामगार आपल्या गावाकडे गेल्याने येथील नागरिकांचे प्रमाण घटले आहे. आणि त्याचा परिणाम या आठवडा बाजारावर झाला असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. या बाजारात लहान मोठे असे ६०० व्यापारी येत असतात. या व्यापाऱ्याकडून प्रत्येकी दहा ते वीस रुपये कर ग्रामपंचायतीला देण्यात येतात. या करा पोटी आठ ते नऊ हजार रुपयांचे उत्पन्न ग्रामपंचायतीना प्रत्येक आठवड्याला मिळत असल्याची माहिती या ग्रामपंचायतीचे सरपंच कुमार जाबर यांनी दिली. पूर्वी या बाजारात प्रचंड गर्दी असायची मात्र आता गदीॅ कमी प्रमाणात दिसून येते असेही जाबर यांनी सांगितले. शुक्रवारी येथील कारखान्यांना सुट्टी असते. त्यामुळे सर्वजण आठवड्याचे किराणा, भाजीपाला व इतर सामान येथूनच खरेदी करीत असतात. परप्रांतीय कामगारांमुळेच या आठवडा बाजाराला जास्त महत्व आले आहे. वाडा तालुक्यात खानिवली, शिरीषपाडा, गोऱ्हे, कंचाड या ठिकाणीही आठवडा बाजार भरतो मात्र कुडूस येथील आठवडा बाजार हा सर्वात मोठा असतो. (वार्ताहर)