शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या चार तासांत मिळाले ९० हजार रुपयांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 23:55 IST

केडीएमटीला ब्लॉक लाभदायक : ४७ बसच्या ९५ फेऱ्या

कल्याण : एकीकडे उत्पन्न आणि खर्चाच्या वाढत्या तफावतीमुळे केडीएमटी उपक्रम डबघाईला आला असताना बुधवारचा रेल्वेचा चार तासांचा ब्लॉक केडीएमटी उपक्रमासाठी लाभदायक ठरला. कल्याण-डोंबिवली मार्गावर ब्लॉकच्या दरम्यान ४७ बसच्या ९५ फेºया झाल्या. त्यामुळे ९० हजारांच्या आसपास उत्पन्न उपक्रमाला मिळाले आहे.

ठाकुर्ली रेल्वेस्थानकात पादचारी पुलाचे गर्डर टाकण्यासाठी रेल्वेने बुधवारी सकाळी कल्याण-डोंबिवलीदरम्यान चार तासांचा ब्लॉक घेतला होता. या काळात केडीएमटीने २४ बस सोडल्या होत्या. परंतु, प्रवाशांची वाढलेली गर्दी पाहता बसची संख्या ४७ पर्यंत वाढवण्यात आली होती. कल्याण-डोंबिवलीदरम्यानची रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद झाल्यानंतर ती पूर्ववत होईपर्यंत केडीएमटीच्या ९५ फेºया झाल्या.चार तासांच्या ब्लॉकच्या कालावधीत सहा हजार ८०० प्रवाशांनी केडीएमटी बसमधून प्रवास केला. त्यामुळे ९० हजारांच्या आसपास उत्पन्न उपक्रमाला मिळाले आहे, अशी माहिती उपक्रमाकडून देण्यात आली.परिवहन समितीचे सभापती मनोज चौधरी यांच्या आदेशानुसार आणि केडीएमटीचे व्यवस्थापक मारुती खोडके यांच्या मार्गदर्शनानुसार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बुधवारचे नियोजन यशस्वीरीत्या पार पाडून जास्तीतजास्त प्रवाशांना बसची सुविधा दिली.सदस्यांचेही लाभले योगदानच्केडीएमटीचे अधिकारी आणि कर्मचाºयांप्रमाणे केडीएमटी बस उपलब्ध करून देण्याच्या नियोजनात परिवहन सदस्यांचेही विशेष योगदान होते. परिवहनचे भाजपचे सदस्य संजय राणे यांनी डोंबिवलीतील बाजीप्रभू चौकात सकाळी ९ वाजल्यापासूनच उपस्थिती लावत येथील यंत्रणा कुशलतेने हाताळली. रेल्वेचा ब्लॉक संपेपर्यंत त्यांनी येथील नियोजन सांभाळले.च्परिवहनचे सभापती मनोज चौधरी यांनी पत्रीपूल परिसरातील वाहतूककोंडी सोडविल्यानंतर बाजीप्रभू चौकात उपस्थिती लावली. त्यांच्यासह माजी सभापती सुधीर पाटील यांचाही येथे नियोजन यशस्वी करण्यात हातभार लागला. भाजपचे अन्य सदस्य दिनेश गोर हे देखील यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेdombivaliडोंबिवलीBus Driverबसचालक