शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सेनेच्या सदस्यांमध्येच जुंपली, विषय भरकटल्याने ठेवला स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 02:08 IST

नगरपालिकेने ११ कोटी खर्च करून नव्या प्रशासकीय इमारतीचे काम सुरू केले आहे.

अंबरनाथ : नगरपालिकेने ११ कोटी खर्च करून नव्या प्रशासकीय इमारतीचे काम सुरू केले आहे. याच कामात भर टाकून या इमारतीवर आणखी दोन मजले वाढविण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला आहे. सर्वसाधारण सभेत या विषयाला मंजुरी देण्यासाठी चर्चा झाली. मात्र ही चर्चा इतकी भरकटली की विषय बाजूला ठेऊन एकमेकांच्याउणिवा काढण्यात शिवसेना नगरसेवक व्यस्त झाले. त्यामुळे हा महत्वपूर्ण विषय स्थगित ठेवावा लागला.शिवसेनेतील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. नगराध्यक्ष मनिषा वाळेकर आणि उपनगराध्यक्ष अब्दुल शेख असे दोन गट एकमेकांवर आरोप करत होते. पालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या वाढीव बांधकामाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी सभागृहात चर्चा सुरू असताना उपनगराध्यक्षांनी हा विषय ज्या पध्दतीने मांडला त्यास विरोध केला.या इमारतीचे बांधकाम निकृष्ट असल्याचा आरोप त्यांनी केला. यावर वाळेकर गट चांगलेच आक्रमक झाले. शहराच्या आणि पालिकेच्या हिताच्या प्रत्येक प्रकल्पाला आपण विरोध करता असा आरोप नगरसेवक राजू वाळेकर यांनी केला. भविष्याचा विचार करून या इमारतीचे बांधकाम आता वाढविणे गरजेचे आहे. त्यात आर्थिक तरतूदही होत आहे. त्यामुळे हा विषय मंजूर होणे गरजेचे आहे असे मत वाळेकर गटातील नगरसेवकांनी मांडले.विषय महत्वाचा असतानाही या विषयावर शिवसेनेच्या नेत्यांनीही हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे वादावादी वाढू नये यासाठी प्रशासकीय इमारतीच्या वाढीव बांधकामाचा विषय हा स्थगित ठेवण्यात आला.इमारतीचे बांधकाम हे सध्याच्या कार्यालयाच्यामागील बाजूला सुरू आहे. या इमारतीची निविदा या आधीच काढलेली आहे. तळमजला आणि त्यावर दोन मजले अशी इमारत मंजूर असून त्यासाठी ११ कोटी निधी राखीव ठेवला आहे.यापैकी पाच कोटी सरकारकडून आले आहे. तर उर्वरित निधी पालिका स्वत:च्या निधीतून उभारणार आहे. त्यातच पालिकेला सरकारकडून पुरस्काराच्या स्वरुपात मिळालेले चार कोटीही याच प्रकल्पासाठी वापरण्यात येणार असल्याने या इमारतीसाठी निधी अपुरा पडणार नाही.मात्र भविष्यात अंबरनाथ महापालिका झाल्यास प्रशासकीय कामासाठी प्रस्तावित इमारत ही अपुरी पडेल याचा विचार करुन पालिकेने बांधकाम सुरु असतानाच या इमारतीवर आणखी दोनमजले वाढविण्याचा विचार सुरू केला आहे. त्यासाठी सात कोटीचा प्रस्तावही तयार केला आहे. वरिष्ठ कुठला निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.