शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

अनधिकृत बांधकाम साठी ठेक्याचे कनिष्ठ अभियंता

By धीरज परब | Updated: June 21, 2023 21:21 IST

अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे यांच्यावर ठोस व कठोर कारवाई तात्काळ व्हावी यासाठी न्यायालयांसह शासनाने वेळोवेळी आदेश दिले आहेत .

मीरारोड - मीरा भाईंदर शहरात बेकायदा बांधकामे मोठ्या प्रमाणात असताना तसेच ह्यात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप असताना देखील या महत्वाच्या कामी ६ प्रभाग समित्यां मध्ये प्रशासनाने सर्व ९ कनिष्ठ अभियंते हे ठेक्याचे नेमले आहेत . बेकायदा बांधकाम वा गैरप्रकार प्रकरणी ठेक्याच्या ह्या अभियंत्यांना फारसे जबाबदार सुद्धा धरता येणार नाही . त्यामुळे प्रभाग अधिकाऱ्यां पासून अतिक्रमण विभागाचे बडे अधिकारी यांच्या संगमताने हे चालले असून बेकायदा बांधकामांवर कारवाई ऐवजी संरक्षण देणे आणि अर्थपूर्ण तक्रारींवरून मनमानी कारवाई केली जात आहे . 

अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे यांच्यावर ठोस व कठोर कारवाई तात्काळ व्हावी यासाठी न्यायालयांसह शासनाने वेळोवेळी आदेश दिले आहेत . कायदे नियमात देखील स्पष्ट असे निर्देश आहेत . तसे असताना मीरा भाईंदर हे अनधिकृत बांधकामांची बजबजपुरी म्हणून गेल्या काही वर्षात कुप्रसिद्ध झालेले आहे . कारण अनधिकृत बांधकामात बक्कळ कमाई असल्याने ठोस कारवाई ऐवजी त्यांना संरक्षण दिले जाते . 

बेकायदा बांधकामांच्या सातत्याने तक्रारी येत असताना कारवाई मात्र झालीच तर थातुर मातुर वा सोयीची केली जाते . तोडलेली बांधकामे पुन्हा उभी राहतात . अनधिकृत बांधकामात लाच घेताना अनेक अधिकारी व नगरसेवक हे पकडले गेले असून तसे गुन्हे दाखल आहेत . म्हणजेच नगरसेवक , राजकारणी , अधिकारी यांची भ्रष्ट युती अनधिकृत बांधकामात असल्याचे लपून राहिलेले नाही . 

अनधिकृत बांधकामांवर कार्यवाहीची जबाबदारी प्रभाग समिती स्तरावर प्रभाग अधिकारी यांची आहे . शिवाय वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकारी - कर्मचाऱ्यांची सुद्धा आहेच . परंतु महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर कारवाई साठी प्रभाग समिती मध्ये चक्क ठेक्यावरचे कनिष्ठ अभियंता नेमले आहेत . त्यामुळे बेकायदा बांधकामे वाढली वा कारवाई झाली नाही तरी ठेक्याच्या अधिकाऱ्यांवर खापर फोडून प्रभाग अधिकारी व वरिष्ठ हे नामा निराळे राहणार आहेत . मात्र अनधिकृत बांधकामास संरक्षण देण्यासाठी वा एखाद्याच्या फायद्यासाठी कारवाई  करण्यात ह्याच ठेक्याच्या अधिकाऱ्यांचा वापर केला जातोय असे पेणकरपाडा येथील घटने वरून पुन्हा एकदा समोर आले आहे . 

येथील बिल्डरच्या तक्रारी वरून शासन आदेश डावलून पावसाळ्यात राहते घर तोडण्यात आले . त्यावरूनच शुभम पाटील ह्या ठेक्याच्या कनिष्ठ अभियंत्याच्या कानशिलात आमदार गीता जैन यांनी मारले आणि नवीन वादाला तोंड फुटले . आ . जैन यांच्यावर कारवाई झाली पाहिजे मात्र बिल्डरच्या फायद्यासाठी शासन आदेश धाब्यावर बसवून राहते घर तोडण्याचे धाडस ह्या ठेक्याच्या कनिष्ठ अभियंत्यांनी कोणते कर्तव्य बजावत केले ? त्यामुळे शहरातील अनधिकृत बांधकामांना मोठ्या प्रमाणात दिले जाणारे संरक्षण आणि सुविधा ह्या महापालिका अधिकारी आणि ठेक्याच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने होत आहेत यात दुमत नाही . त्यातच प्रशासकीय राजवट असल्याने हे अधिकारी बेछूट , बेधुंद व मुजोर झाल्याचे देखील नाकारता येणार नाही . 

टॅग्स :mira roadमीरा रोड