शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बदल्यांमधील सेवा जेष्ठ शिक्षकांवरील अन्याय दूर करण्याचे न्यायायलीन आदेश; १० मेला सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 15:31 IST

. सेवा जेष्ठता असूनही बदल्यांमध्ये अन्याय झाल्यामुळे बहुतांशी शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली. त्यास अनुसरून विभागीय आयुक्तांनी या शिक्षकांवरील अन्याय दूर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. यावर १० मे रोजी पहिली सुनावणी

ठळक मुद्देकोकणातील ठाणेसह, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या आॅनलाइन झाल्यासेवा जेष्ठतेचा विचार न करता शिक्षकांच्या नको असलेल्या ठिकाणच्या शाळांवर बदली करण्याचा पराक्रमविभागीय आयुक्तांनी या शिक्षकांवरील अन्याय दूर करण्याचे आदेश

ठाणे : जिल्हा परिषदेच्या दोन हजार ११९ प्राथमिक शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्या सुमारे दोन महिन्यापूर्वी झाल्या. सेवा जेष्ठता असूनही बदल्यांमध्ये अन्याय झाल्यामुळे बहुतांशी शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली. त्यास अनुसरून विभागीय आयुक्तांनी या शिक्षकांवरील अन्याय दूर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. यावर १० मे रोजी पहिली सुनावणी विभागीय आयुक्तालयांच्या दालनात होणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) हिरालाल सोनावणे यांनी लोकमतला सांगितले.कोकणातील ठाणेसह, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या आॅनलाइन झाल्या आहेत. या बदल्यांमध्ये सेवा जेष्ठता असलेल्या शिक्षकांना प्राधान्याने जवळच्या शाळेवर बदली होणे अपेक्षित होते. मात्र ही सेवा जेष्ठता डावलल्याने संबंधीत शिक्षकाना प्राधान्यक्रमाची शाळा मिळाली नाही. यामुळे या पाच ही जिल्हह्यातील शिक्षकांनी एकत्र येऊन न्यायालयात धाव घेतली असता त्यावर सुनावणी होऊन विभागीय आयुक्ताना या शिक्षकांवरील अन्याय दूर करण्याचे आदेश न्यायालयाने जारी केले आहेत. त्यास अनुसरून विभागीय आयुक्तांकडे पहिल्या टप्यातील सुनावणीचे नियोजन १० मे रोजी करण्यात आले आहेत.या आॅन लाइन बदल्यांमधील झालेला घोळ या आधीच लोकमतने उघड केलेला आहे. त्याची दखल घेऊन विभागीय आयुक्तांनी संबंधीत सीईओंना शिक्षकांच्या तक्रारींची सखोपणे चौकशी करून अभिप्राय देण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यावर अजून काम सुरूच आहे. त्यातील घोळ मिटण्या आधीच सेवा जेष्ठतेचा विचार न करता शिक्षकांच्या नको असलेल्या ठिकाणच्या शाळांवर बदली करण्याचा पराक्रम करण्यात आला. या प्रमाणेच शिक्षकांवरील अन्याय दूर करण्यासाठी ठाणे सीईओंनी शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश देऊन चौकशी करण्यास भाग पाडले आहेत. पण त्यातही शिक्षणाधिकाऱ्यांनी केवळ संवर्ग १ व २ नुसार बदली झालेल्या शिक्षकांचे कागदपत्रे तपासणीसाठी मागीतले. या तपासणीतून सर्वाधिक व प्रशासनाची फसवणूक झालेले संवर्ग तीन व चारच्या बदलीसाठी वापरलेले कागदपत्रे तपासणी शिक्षणविभागाने सोयीस्कररित्या टाळले जात असल्याची चर्चा शिक्षकांमध्ये आहे.कागदपत्र तपासणी टाळली जात असलेल्या संवर्ग तीन व चार प्रमाणेच अवघड नसलेली शाळा अवघड क्षेत्रात असल्याची खोटी माहिती देऊन काही शिक्षकांना सोयीच्या शाळांवर प्राधान्याने बदली मिळाली आहे. त्या विरोधातही शिक्षकांमध्ये तीव्र संताप आहे. एवढेच नव्हे तर पतीपत्नी एकत्रीकरणाच्या बदलीसाठी देखील काही शिक्षकांनी खोटी माहिती देऊन या निकषाचा लाभ घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संबंधीत शिक्षकांवर अन्याय झाल्यामुळे त्यांच्यातही तीव्र संताप आहे. याकडे देखील सीईओ यांच्यासह शिक्षणाधिकाºयांनी गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अन्यथा आॅनलाइन बदल्यांचा हा घोळ पुन्हा वाढत जाण्याची शक्यता काही जाणकार शिक्षकांकडून सांगितली जात आहे.

टॅग्स :thaneठाणेzp schoolजिल्हा परिषद शाळा