शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

पत्रकारांनी जांभेकरांसारखे सडेतोड लिखाण करावे - राज्यमंत्री रवींद्र चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 02:38 IST

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांसारखी सडेतोड पत्रकारिता नव्या पिढीतील पत्रकारांनी करावी, अशी अपेक्षा वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी व्यक्त केली. समस्या सोडवण्यासाठी सतर्क, दक्ष पत्रकार असणे अत्यंत महत्त्वाचे असून त्यांनी निर्भीडपणे लिखाण करणे आवश्यक आहे, असेही चव्हाण म्हणाले.

डोंबिवली : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांसारखी सडेतोड पत्रकारिता नव्या पिढीतील पत्रकारांनी करावी, अशी अपेक्षा वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी व्यक्त केली. समस्या सोडवण्यासाठी सतर्क, दक्ष पत्रकार असणे अत्यंत महत्त्वाचे असून त्यांनी निर्भीडपणे लिखाण करणे आवश्यक आहे, असेही चव्हाण म्हणाले.कल्याण-डोंबिवली पत्रकार संघाच्या वतीने बालभवन येथे पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी राज्यमंत्री चव्हाण बोलत होते. महापौर राजेंद्र देवळेकर, सहायक पोलीस उपायुक्त दत्तात्रेय कांबळे, ‘लोकमत’चे वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान, न्यूज १८ ‘लोकमत’चे न्यूज एडिटर राजेंद्र हुंजे, आयएमएचे सहसचिव डॉ. मंगेश पाटे, अण्णा बेटावदकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय राऊत, डोंबिवली विभागीय अध्यक्ष अनिकेत घमंडी आदींसह मान्यवर उपस्थित होते.पत्रकार केतन बेटावदकर यांना झुंजार पत्रकार, ‘लोकमत’चे पत्रकार प्रशांत माने यांना कै. श्रीकांत टोळ स्मृती पुरस्कार, झी २४ तासचे प्रतिनिधी विशाल वैद्य यांना रत्नाकर चासकर पुरस्कार, डॉ. पाटे यांना पत्रकारमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.राज्यमंत्री चव्हाण म्हणाले की, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर हे कोकणातले, मीही कोकणातला म्हणूनच सडेतोड आणि रोखठोक, स्पष्ट बोलणे हे आपल्याला अपेक्षित असते.महापौर देवळेकर म्हणाले की, नव्या पत्रकार भवनाची वास्तू लागलीच कधी उभारली जाईल, ते सांगता येत नाही. पण, बालभवनची जागा पत्रकारांना त्यांच्या उपक्रमांसाठी विनामूल्य देण्यात येईल. आगामी काळात पत्रकार हल्लाविरोधी कायदा संमत झाला की, अनेक समस्या मार्गी लागतीलच, असा विश्वासही देवळेकर यांनी व्यक्त केला.‘लोकमत’चे वरिष्ठ सहायक संपादक प्रधान म्हणाले की, नवोदित पत्रकारांच्या लेखनात अनेक चुका असतात. विषयाची माहिती नसल्याने लिखाणात स्पष्टता नसते. त्या सुधारण्याची नितांत गरज आहे. नव्या डिजिटल मीडियात वेळेची स्पर्धा जिंकतानाच चुकीची बातमी दिल्याने विश्वासार्हता गमावून बसणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. पत्रकार हुंजे म्हणाले की, पत्रकारांना अत्याधुनिकता आणि अचूकता दोन्ही साधणे गरजेचे आहे. पत्रकारांवर होणारे हल्ले खपवून घेतले जाता कामा नयेत. डॉ. पाटे यांनी डॉक्टरांवरील हल्ले कायद्याने थांबले नाहीत, अशी खंत व्यक्त केली. पत्रकार संघाचे डोंबिवली अध्यक्ष अनिकेत घमंडी यांनी मान्यवरांचे स्वागत व आभारप्रदर्शन केले, तर पत्रकार निनाद करमरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.उपमहापौर मोरेश्वर भोईर, विरोधी पक्षनेते मंदार हळबे, ज्येष्ठ नगरसेवक स्थायीचे सभापती रमेश म्हात्रे, केडीएमसीचे उपायुक्त सु.रा.पवार, राहुल दामले, संदीप पुराणिक, राजन आभाळे, विनोद काळण, निलेश म्हात्रे, विशू पेडणेकर, सरचिटणीस शशिकांत कांबळे, संजीव बीडवाडकर, नगरसेविका खुशबू चौधरी, डॉ. सुनीता पाटील, हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष अजित शेट्टी, डॉ. अर्चना पाटे, महापालिकेचे माजी सचिव चंद्रकांत माने, दत्ता माळेकर, रवी ठाकूर, नंदू परब आदी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :dombivaliडोंबिवली