शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

ध्वनिप्रदूषणाने जोशी रुग्णालयातील रुग्ण त्रस्त; मैदानात होतात कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 23:28 IST

रहिवाशीही आले मेटाकुटीला, यंत्रणेची डोळेझाक, नगरसेवकही बसले गप्प

भाईंदर : येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील रुग्णांसह परिसरातील रहिवासी येथील मैदानातील बेकायदा कार्यक्रम-समारंभातील रोजच्या ध्वनिप्रदूषणाने मेटाकुटीला आले आहेत. रुग्णालय व शाळा हे शांतता क्षेत्रात मोडत असूनही येथे दिवसरात्र वर्दळ सुरू असते. स्थानिक नगरसेवकांसह महापालिका व पोलिसांकडून कारवाई होत नसतानाच या भागात राहणारे महापालिकेचे अनेक अधिकारी, नगरसेवकही चिडीचूप असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.मीरा-भार्इंदर महापालिकेचे २०० खाटांचे जोशी रुग्णालय असून सध्या त्याचे व्यवस्थापन सरकार पाहत आहे. याच ठिकाणी शवागार आणि शवविच्छेदन केंद्र तसेच परिसरात दोन शाळा आहेत. रुग्णालय, शाळा शांतता क्षेत्रात मोडत असल्याने या परिसरात ध्वनिक्षेपणास मनाई आहे. आजूबाजूचा परिसर निवासी इमारती, संकुलांचा आहे. तसे असताना या परिसरात काही मोकळे भूखंड हे विविध कार्यक्रम, लग्न आदी समारंभांसाठी भाड्याने दिले जातात. त्यासाठी काहींनी तर भलेमोठे मंडप कायमस्वरूपी उभारले आहेत.महापालिकेची कोणतीच परवानगी न घेता तसेच महासभेच्या ठरावानुसार शुल्क न भरता येथे सर्रास विविध कार्यक्रम, समारंभ होतात. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत मोठ्या कर्णकर्कश आवाजात कानठळ्या बसवणारे ध्वनिक्षेपक यंत्रणांचा वापर केला जातो. अगदी मध्यरात्रीनंतर वा पहाटेच्यावेळीही फटाके फोडणे, बॅण्ड वाजवणे, ध्वनिक्षेपक लावण्याचे प्रकार नेहमीचेच झाले आहेत. कार्यक्रमांसाठी येणारी वाहने भररस्त्यातच लावली जात असल्याने वाहतूककोंडी नित्याचीच झालेली आहे.या ध्वनिप्रदूषणामुळे जोशी रुग्णालयातील रुग्णांसह परिसरातील कस्तुरी गार्डन, बेकरी गल्ली, ठाकूर गल्ली, मॅक्सस मॉलमागील परिसरातील रहिवासी मेटाकुटीला आले आहेत. झोप लागणे अशक्य होते. कधी कानठळ्या बसवणारा आवाज सुरू होईल आणि झोपमोड होईल, याचा नेम नसतो. रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, लहान बाळ, विद्यार्थी आदींना तर या ध्वनिप्रदूषणामुळे त्रास होतोच, पण नोकरदार महिला, पुरुषांनाही हा जाच नकोसा झाला आहे. खिडक्या कडेकोट बंद करून तर काहींना कानांत बोळे घालून झोपावे लागते.रुग्णालय, शाळा व निवासी परिसर असूनही बेकायदा कार्यक्रमांच्या माध्यमातून चालणाऱ्या या ध्वनिप्रदूषणाविरोधात नगरसेवक, महापालिका, पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करतात. खुल्या मैदानातील कार्यक्रम-समारंभांमधून मोठे उत्पन्न मिळत असल्याने कारवाई केली जात नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.या प्रभागात चार नगरसेवक असून त्यात भाजपचे डॉ. सुशील अग्रवाल, सुरेश खंडेलवाल व वैशाली रकवी, तर शिवसेना नगरसेविका कॅटलीन परेरा यांचा समावेश आहे. या परिसरात भाजप नगरसेविका दीपाली मोकाशी, पालिकेचे अधिकारी संजय दोंदे, गोविंद परब, शरद बेलवटे आदी राहत असताना ते देखील याकडे सोयीस्कर डोळेझाक करत आहेत.कार्यक्रमामुळे परिसरात होते वाहतूककोंडीयाप्रकरणी स्थानिक रहिवासी प्रकाश लिमये यांनी महापालिका व पोलिसांना लेखी तक्रार करून ठोस कारवाईची मागणी केली आहे. शांतता क्षेत्राचे तसेच ध्वनिप्रदूषण कायदा व ध्वनिमर्यादेचे काटेकोर पालन केले जावे. या ठिकाणी कार्यक्रमांसाठी येणाºया गाड्यांमुळे कोंडी होत असल्याने अशा वाहनांवर कारवाई करावी. बेकायदा झालेले मंडप व कार्यक्रम बंद करावेत, अशी मागणी लिमये यांनी रहिवाशांच्या वतीने केली आहे.