शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जोशी रूग्णालयाच्या हस्तांतरात विघ्ने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 01:17 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेचे भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयाच्या हस्तांतराची अंतिम कार्यवाही २४ जूनला पार पडली. यामुळे कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला नुकतीच सुरूवात झाली

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेचे भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयाच्या हस्तांतराची अंतिम कार्यवाही २४ जूनला पार पडली. यामुळे कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला नुकतीच सुरूवात झाली. परंतु, या रूग्णालयाच्या जागेची मालकी राज्य सरकारऐवजी अद्याप पालिकेच्याच नावे असल्याने हस्तांतराच्या कार्यवाहीला ब्रेक लागला आहे.९ आॅगस्ट २०१६ मध्ये रूग्णालय हस्तांतराच्या प्रारुप करारनाम्याला मान्यता दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हस्तांतरणावर शिक्कामोर्तब झाले. कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी सरकारने पालिका व जिल्हा आरोग्य उपसंचालकांना सहा महिन्यांचा अवधी दिला. परंतु, त्यात रुग्णालयातील अपूर्ण कामांसह पालिका कर्मचाºयांचा सरकारी सेवेतील समावेश, जागेची मालकी, आवश्यक मनुष्यबळासाठी नवीन पदनिर्मितीचा खोडा निर्माण झाल्याने हस्तांतर दीड वर्षे रखडले. पालिका सेवेतील ३६ कर्मचाºयांचा सरकारी सेवेतील समावेशानंतर ३६५ पदांच्या नवीन निर्मितीला मान्यता दिल्याचा आदेश काढला. यानंतर तब्बल चार महिन्यानंतर कराराला मान्यता देत हस्तांतराची कार्यवाही पूर्ण झाली. हस्तांतराची कार्यवाही पूर्ण झाल्याचे स्पष्ट झाले असतानाच त्यात जागेच्या मालकीची अडचण निर्माण झाली. चार मजली रुग्णालयातील तीन मजल्यापर्यंतचे काम पूर्ण झाले असून चौथ्या मजल्यावरील काम अपूर्ण आहे. येथील कामासाठी पालिकेला ५ ते १० कोटी खर्च करावे लागणार आहे. रुग्णालयाच्या बांधकामासाठी पालिकेने १६ कोटी खर्च केले आहेत. रूग्णालयात शल्य चिकीत्सक डॉ. विजय काळबांडे यांच्यासह चार वैद्यकीय अधिकारी, ३ अधिपरिचारीका व २ लिपीक नुकतेच रुजू झाले आहेत. परंतु, जागेच्या प्रॉपर्टी कार्डवर राज्य सरकारचे नावच आलेले नाही.