शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

बीएआरसीत नोकरीचे अमिष दाखवून फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 01:44 IST

मुलाला नोकरीला लावण्याचे अमिष दाखवून अमृत मंडले (रा. सावरकरनगर, ठाणे) आणि रविराज चव्हाण (रा. वायफळे, तासगाव, जि. सांगली) यांच्यासह पाच जणांनी कोल्हापूर (कळंबा) येथील तानाजी देसाई या लष्कारातील माजी सैनिकाकडून चार लाख ७५ हजारांची रक्कम घेतली.

ठाणे : मुंबईतील भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये मुलाला नोकरीला लावण्याचे अमिष दाखवून अमृत मंडले (रा. सावरकरनगर, ठाणे) आणि रविराज चव्हाण (रा. वायफळे, तासगाव, जि. सांगली) यांच्यासह पाच जणांनी कोल्हापूर (कळंबा) येथील तानाजी देसाई या लष्कारातील माजी सैनिकाकडून चार लाख ७५ हजारांची रक्कम घेतली. गेल्या वर्षभरात त्यांच्या मुलाला नोकरीला न लावता पैसेही परत न केल्याने अखेर त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.अशोक शिंदे यांच्याशी २०१६ मध्ये मीरज रेल्वेस्थानकावर कोल्हापुरातील देसाई यांची भेट झाली होती. याच ओळखीतून पुढे शिंदे यांनी आपण आर्मी भरतीची अकादमी चालवित असून आपली मुंबईत ओळख आहे. त्यामुळे मानखुर्द येथील भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये तुमच्या मुलाला ओळखीने नोकरीला लावतो, असे त्यांनी अमिष दाखविले. त्यासाठी तुम्हाला आधी काही पैसे द्यावे लागतील, असेही सांगितले. त्यानंतर ठाणे येथून अमृत मंडले याने शिंदे यांच्या मार्फतीने रविराज चव्हाण यांचा ई मेल आयडी दिला. त्यावर त्यांच्या मुलाची कागदपत्रे पाठविण्यास सांगितले. पुढे चव्हाण यांनी शिंदे यांच्या मार्फतीने निरोप दिला की, त्यांचा मुलगा इंद्रजित यास भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये नोकरी मिळू शकते. त्यासाठी सहा लाख द्यावे लागतील. पण वैद्यकीय तपासणीसाठी ५० हजार द्यावे लागतील. २८ मे २०१८ रोजी त्याची वैद्यकीय तपासणी केली. त्यासाठी त्यांनी रविराज यांच्याकडे ५० हजारांची रक्कम दिली. या तपासणीसाठी रविराज याने भाभा अणुसंशोधन केंद्राचे नाव असलेले लेटरपॅडही आणले. या तपासणीनंतर मंडले यांच्या बँक खात्यावर त्यांनी रक्कम पाठविण्यास सांगितले.>या पाच जणांनी गेल्या वर्षभरात चार लाख ७५ हजारांची रक्कम घेतली. पण मुलाला कुठे नोकरीही लागली नाही आणि त्यांचे पैसेही परत केले नाही. याबाबतची त्यांनी आधी कोल्हापूरच्या राजावाडी पोलीस ठाण्यात ३ जानेवारी रोजी तक्रार दिली. हीच तक्रार आता ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात ६ जानेवारी २०२० रोजी वर्ग करण्यात आली आहे.