शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जिमच्या व्यावसायिकाची १७ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:00 IST

भागीदारांविरोधात गुन्हा; धनादेशावर केल्या बनावट स्वाक्षऱ्या

ठाणे : ठाण्यातील ‘बॉडीझोन’ या जिममालकाची दीपाली आठवले, पंकज आठवले आणि कनोज उतेकर या तिघांनी १७ लाख ४० हजारांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.नौपाड्यातील विष्णुनगर भागात राहणारे पंकज आठवले, दीपाली आठवले, कनोज उतेकर आणि तक्रारदार चिन्मय चटर्जी हे चौघेही बॉडीझोन जिममध्ये भागीदार आहेत. दीपाली आणि कनोज या भागीदारांनी जिमच्या व्यवसायातील नफा झालेल्या रकमेच्या व्यवहारात गैरव्यवहार केल्यामुळे सारस्वत बँकेच्या लेखापरीक्षण अहवालानुसार १७ लाख ४० हजारांचा तोटा चटर्जी यांना झाल्याची बाब समोर आली. त्यानुसार या दोघांनी त्यांच्या १७ लाख ४० हजारांचा अपहार करून फसवणूक केल्याचे उघड झाले.अन्य एक आरोपी पंकज आठवले याने बॉडीझोन जिमचे चालू खाते असलेल्या सारस्वत बँकेच्या तीन वेगवेगळ्या धनादेशांवर बनावट स्वाक्षºया करून हे धनादेश पुण्याच्या गजानन एंटरप्रायजेस यांना दिले. हे धनादेशही वठले न गेल्याने (बाउन्स झाल्याने) गजानन एंटरप्रायजेस यांनी चटर्जी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा संपूर्ण प्रकार जून २०१८ ते जानेवारी २०१९ या काळात घडला. आठवले आणि उतेकर यांनी फसवणूक केल्यामुळे चटर्जी यांच्याविरुद्ध नाहक गुन्हा दाखल झाला. या फसवणुकीनंतर आपल्याला मोठा धक्का बसून मोठा मनस्ताप सहन करावा लागल्याचे तक्रारदार चिन्मय चटर्जी यांनी सांगितले. याप्रकरणी नौपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.पुरावा गोळा करण्याचे काम सुरूविनाकारण मनस्ताप सहन करावा लागल्यामुळे तसेच आपली फसवणूक झाल्यामुळे त्यांनी अखेर याप्रकरणी उतेकर याच्यासह तिघांविरुद्ध १८ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.याप्रकरणी चौकशी सुरू असून पुरावे गोळा करण्यात येत आहेत. त्यामुळे अद्याप कोणालाही अटक केली नसल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले. पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजी