शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अपघातग्रस्तास मदत करून दागिने, ऐवजही कुटुंबीयांना सुपूर्द; ठाणे वाहतूक पोलिसांची कामगिरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 23:43 IST

हे चौघेही तत्काळ घटनास्थळी पोहोचून राहुल केवट याच्या मदतीने जगदीशला एका रिक्षात बसवून जवळच्याच एका खासगी रुग्णालयात दाखल केले.

ठाणे : मोटारसायकल घसरल्याने जगदीश यादव हा मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली होती. त्याला कासारवडवली वाहतूक नियंत्रण उपशाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याचवेळी तिथे पडलेली ७० हजारांची रोकड, अडीच लाखांचे दागिने आणि मोबाइल असा तीन लाख ३० हजारांच्या ऐवजाची पिशवीही जगदीश यांची पत्नी मीरा यांच्याकडे सुखरूप सुपूर्द केल्याने वाहतूक पोलिसांचे कौतुक होत आहे.

२४ मार्चला सायंकाळी ७ च्या सुमारास नागला बंदर, घोडबंदर मार्गावरील सेवा रस्त्यावर जगदीश यादव (५०) यांची मोटारसायकल घसरल्याने ते रस्त्यावर जखमी अवस्थेमध्ये पडल्याची माहिती पोलीस हवालदार राजेंद्र मोरे, पोलीस नाईक अविनाश वाघचौरे, अमलदार बबन खेडेकर आणि नवनाथ थोरवे यांना मिळाली. 

ही माहिती मिळताच, हे चौघेही तत्काळ घटनास्थळी पोहोचून राहुल केवट याच्या मदतीने जगदीशला एका रिक्षात बसवून जवळच्याच एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याचवेळी रस्त्यावर पडलेली मोटारसायकल त्यांनी रस्त्याच्या कडेला घेतली. घटनास्थळापासून जवळच पडलेली एक पिवळ्या रंगाची पिशवीही पोलीस नाईक वाघचौरे यांना मिळाली. त्यामध्ये काही रोकड, सोन्याचे दागिने आणि दोन मोबाइल आढळले. ही बाब या कर्मचाऱ्यांनी तत्काळ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांच्या निदर्शनास आणून दिली. आव्हाड यांनी ही बाब पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्यासह मुख्य नियंत्रण कक्ष आणि वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षाला दिली. जखमीच्या नातेवाइकांना हा ऐवज देण्याचे आदेश उपायुक्त पाटील यांनी दिले. 

ही माहिती मिळाल्यानंतर जगदीश यांची पत्नी मीरा यादव (४७) या रात्री ८ वाजता कासारवडवली वाहतूक शाखेत दाखल झाल्या. त्यांची ओळख पटल्यानंतर पोलीस निरीक्षक आव्हाड यांनी रोख ७० हजार रुपये, ५० ग्रॅम वजनाचे अडीच लाखांचे सोन्याचे दागिने, दहा हजारांचे दोन मोबाईल, पॅनकार्ड आणि आधारकार्ड असा तीन लाख ३० हजारांचा ऐवज मीरा यांच्याकडे सुखरूप सुपूर्द केला. पोलिसांच्या या तत्परतेमुळे त्यांनी वाहतूक पोलिसांचे विशेष आभार मानले. पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल केल्यामुळे गुरुवारी जगदीश यांच्या हातावर यशस्वी शस्त्रक्रियाही पार पडल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली.