शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जव्हार प्रतिष्ठानचा सर्वपक्षीयांना दे धक्का!

By admin | Updated: May 27, 2017 02:05 IST

येथील नगरपरिषदेच्या पोट निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास सुरु होऊन अवघ्या तासाभरात बुध निहाय निकाल जाहिर झाला

हुसेन मेमन। लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : येथील नगरपरिषदेच्या पोट निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास सुरु होऊन अवघ्या तासाभरात बुध निहाय निकाल जाहिर झाला. यात भरत पाटील प्रणित जव्हार प्रतिष्ठान ने जव्हार मधील सर्वपक्षियांना धक्का देत चारही जागांवर सरशी मिळवली. आदिवासी भवन येथे ही मत मोजणी पार पडली. पवनीत कौर हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थित होते. या निकालामुळे जव्हारच्या राजकारणाला कलाटणी मिळाली असून सर्व पक्षियांना जनतेने जागा दाखवली असल्याचे बोलले जात आहे.प्रभाग क्र. १ मधून अशोक गावंड यांनी बंडखोरी करून स्वबळावर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला व स्वबळावर ४२४ मते मिळविली असून अवघ्या १६४ मतांनी त्यांचा पराभव झाल्यामुळे एका जागेवर सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार राजेश रजपुत यांनी विजय मिळविला आहे. मात्र, प्रतिष्ठानच्या या विजयाने सगळ्यांनाच धक्का दिला असून यापुढे नगरपरिषदेची होणारी मुख्य निवडणूकीतही जव्हारमधील सर्व पक्षाना तगडे आव्हान निर्माण झाले आहे.पाच जागांवरील उमेदवार अपात्र ठरल्यानंतर या जागांसाठी जव्हारची पोटनिवडणुक झाली मात्र सुरवातीला ही निवडणूकच नको कारण अवघ्या काही महीन्यांवर मुख्य निवडणूक होणार असल्याचे सर्वपक्षीयानी बहीष्काराची भूमिका घेतली होती. मात्र जव्हार प्रतिष्ठानने ही निवडणूक लढण्याचे जाहिर केल्यानंतर याला शह देण्यासाठी कोणत्याही पक्षाचे चिन्ह न वापरता आपलेच उमेदवार अपक्ष म्हणून उतरवून प्रतिष्ठानला शह देण्याचे काम केले. मात्र, प्रतिष्ठानचे भरत पाटील यांची प्रभाग १ मधील उमेदवारी अर्ज बाद ठरल्याने उर्वरित ४ जागांवर प्रतिष्ठानचा उमेदवार विरूध्द सर्वपक्षीय अशी लढत झाल्याचे चित्र होते. दरम्यान, या पोटनिवडणुकीत जव्हार प्रतिष्ठानने विरोधी उमेदवारांना चारीमुंड्या चित करुन आपला झेंडा जव्हारमध्ये रोवल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या निकालामुळे काही महीन्यांवर येऊन ठेपलेल्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये अनेक समिकरणे बदलण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.मतदारांना हे नाही आवडलं ?मुळात जव्हार नगरपरिषद निवडणूकीत जव्हारकरानी संपूर्ण सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यात दिली होती. १७ पैकी तब्बल १४ जागांवर राष्ट्रवादीचा विजय झाला होता. मात्र, मध्यंतरीच राष्ट्रवादीतुन फूटुन १० जणानी वेगळा गटस्थापन केल्यामुळे नगरपरिषदेचा जास्त वेळ या राजकारणातच गेला. त्यातच पाच नगरसेवक अपात्र ठरल्यामुळे पोटनिवडणुक लागली होती. त्यानंतर सर्वपक्षियांनी घेतलेली भूमिका, प्रतिष्ठान लावून धरलेली भुमिका तसेच पुर्वीचे कुरघोडीचे राजकारण याचा विचार करुन जव्हरच्या जनतेने मतपेटीतून आपला कौल दिला.