शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जवाहरबाग स्मशानभुमी होणार अत्याधुनिक, महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 17:15 IST

येत्या २६ जानेवारी पासून ठाण्यात जवाहरबाग स्मशानभुमी अत्याधुनिक स्वरुपात ठाणेकरांना उपलब्ध होणार आहे. गुरुवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या स्मशानभुमीच्या सुरु असलेल्या कामाची पाहणी केली.

ठळक मुद्देविद्युत व्यवस्था सुरु करण्याचे दिले आदेशयेथील रस्त्याचेही रुंदीकरण करण्याच्या सुचना

ठाणे - जवाहरबाग येथे उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक स्मशानभूमीच्या कामाची महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल गुरुवारी पाहणी केली. स्मशानभूमीशी निगडीत कामे युद्ध पातळीवर करण्याचे आदेश देतानाच येत्या २६ जानवारी रोजी स्मशानभूमी कार्यान्वित करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान राघोबा शंकर रोडवरील स्मशानभूमीच्या समोरील रस्त्याचे बांधकाम करणे व त्यामध्ये बाधित होणाºया २७ कुटुंबांचे पुनर्वसन करण्याचे आदेशही त्यांनी दिले.                  ठाणे महानगरपालिकेच्या नौपाडा प्रभाग समितीतंर्गत जवाहरबाग येथील जुन्या स्मशान भूमीच्याबाजूला नवीन अत्याधुनिक स्मशानभूमीचे काम सुरू करण्यात आले आहे. महापालिका आयुक्तांच्या संकल्पनेतून प्रसिद्ध वास्तुविशारद प्रविण जाधव आणि महापालिका यांनी संयुक्तपणे या स्मशानभूमीचे डिझाईन तयार करण्यात आले आहे. यावेळी त्यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त(१) राजेंद्र अहिवर, उपायुक्त संदीप माळवी, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आर. टी. केंद्रे, नगर अभियंता राजन खांडपेकर, शहर विकास व नियोजन अधिकारी प्रमोद निंबाळकर उपस्थित होते. या स्मशानभूमीची मुलभूत कामे पूर्ण झाली असून स्मशानभूमी समोरील चौकाचे सुशोभिकरण करणे, चौकामधील आजुबाजूच्या माहापालिकेच्या इमारतींची रंगसंगती स्मशानभूमीच्या रंगसंगतीशी सुसंगत करणे, राघोबा शंकर रोडवरील स्मशानभूमीच्या समोरील रस्त्याचे बांधकाम करणे व त्यामध्ये जी २७ कुटुंबे बाधित होत आहेत. त्यांचे पुनर्वसन करणे, स्मशानसोरील फुटपाथची दुरूस्ती करणे, स्शानभूमीजवळील शौचालयाची रंगरंगोटी करणे तसेच महानगर गॅसची पाईपलाईन टाकण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या देणे आदी कामे प्राधान्याने करण्याच्या सूचना त्यांनी नगर अभियंता राजन खांडपेकर यांना दिल्या. त्याचबरोबर स्मशानभूमीच्या चौकामध्ये हाय मास्ट बसविण्याच्या व स्मशानभूमीच्या गेटसमोरील विद्युत पोल हलविण्याच्या सूचना विद्युत विभागाला दिल्या. त्याचबरोबर आरोग्य विभागाने या ठिकाणी आवश्यक तेवढ्या गॅस सिलेंडरची व्यवस्था करण्याचे आदेश दिले.यावेळी आयुक्तांनी स्मशानभूमीच्या आवारात आकर्षक लँडस्केपिंग करणे, आवारात विद्युत व्यवस्था करणे, ध्वनिक्षेपन यंत्रणा लावणे तसेच स्मशानभूमीच्या आवारात माहितीचे फलक लावण्याच्या सूचना संबंधित काम करणाºयाा विकासकाला दिल्या. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त